शहरं
Join us  
Trending Stories
1
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
2
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
3
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
4
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
5
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
6
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
7
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
8
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
9
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
10
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
11
तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
12
आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
13
IPL ला हलक्यात घेणाऱ्यांना लिलावात भाव देऊ नका! 'त्या' परदेशी खेळाडूंवर भडकले गावसकर, म्हणाले...
14
Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा
15
अलर्ट! 'या' ४ समस्या दिसल्यास त्वरित बदला तुमचा स्मार्टफोन; नाहीतर होईल मोठे नुकसान!
16
भारतासाठी गेमचेंजर ठरणार 'हा' नवा कॉरिडोर; रशियाला ४० दिवसांऐवजी आता २४ दिवसांत सामान पोहचणार
17
रुपया पुन्हा घसरला! डॉलरच्या तुलनेत ९०.११ च्या नीचांकी स्तरावर; महत्त्वाचं कारण आलं समोर
18
काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती
19
Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल
20
दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून सरकार थेट खरेदी करणार सफरचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 03:51 IST

रक्कम थेट बँक खात्यात करणार जमा : १५ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया करणार पूर्ण

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून थेट सफरचंदाची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नाफेड ही सरकारी संस्था राज्य सरकारच्या अधिकृत संस्थेमार्फत खरेदीची प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार आहे. शिवाय थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेतहत खरेदीची रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांनी सफरचंद उत्पादकांना बाजारात विक्री न करण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारने उपरोक्त निर्णय घेऊन काश्मीरमधील सफरचंद उत्पादकांना दिलासा दिला आहे. चालू २०१९ च्या हंगामात जम्मू-काश्मीरमधील उत्पादित सफरचंदाची खरेदी केला जाणार आहे.यासंदर्भात एका अधिकाºयाने सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील सर्व श्रेणीतील सफरचंदाची खरेदी केली जाणार आहे. याशिवाय सोपोर, शोपियां आणि श्रीनगरच्या घाऊक बाजारातून थेट खरेदी केली जाईल. विविध श्रेणीतील सफरचंदाचा खरेदी भाव मूल्य समितीतर्फे निश्चित केला जाईल. या समितीत राष्टÑीय फळबाग मंडळाचा एक सदस्य असेल. गुणवत्ता समिती सफरचंदाची योग्य प्रतवारी ठरवील.अन्य एका अधिकाºयाने सांगितले की, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव राज्यस्तरीय अंमलबजावणी आणि समन्यव समितीचे अध्यक्ष असतील, तर केंद्रीय कृषी, गृहमंत्रालय आणि अन्य केंद्रीय संस्थांच्या निगराणीत योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी म्हटले होते की, काश्मीर खोºयातून सफरचंदाचे दररोज ७५० ट्रक देशाच्या विविध भागात जातात. मागच्या शुक्रवारी दहशतवाद्यांनी सोपोरमध्ये एका फळ व्यापाºयाच्या कुटुंबियांवर हल्ला केला होता. यात व्यापाºयाचा मुलगा आणि नातू जखमी झाला होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर