शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'सरकारला पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणायचे आहे, पण...' अर्थमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 18:37 IST

काँग्रेसने आधी त्यांच्या राज्यात जीएसटी परिषद स्थापन करावी.

इंदूर: पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी (GST) अंतर्गत आणण्याची काँग्रेसने अनेकदा मागणी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) च्या कक्षेत आणू इच्छित आहे, परंतु काँग्रेसची या मुद्द्यावर दुटप्पीपणाची भूमिका आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केला.

काँग्रेसवर निशाणानिर्मला सीतारामन यांनी मध्य प्रदेशात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार सुरुवातीपासूनच पेट्रोलियम उत्पादने जीएसटी अंतर्गत आणण्याच्या बाजूने आहे, कारण त्याचा लोकांना फायदा होईल. जे लोक पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यापासून रोखत आहेत ते कोण आहेत? प्रियंका गांधी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या बाजूने असतील, तर त्यांनी काँग्रेसशासित राज्यात जीएसटी परिषद स्थापन करण्यास सांगावे, असे आव्हान त्यांनी यावळी दिले. 

काँग्रेसची दुटप्पी भूमिकात्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेसच्या दुटप्पीपणावर प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला पाहिजे. इस्रायल-हमास युद्धाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, असे विचारले असता, अर्थमंत्री म्हणाल्या, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतींबाबत विविध तर्क लावले जात आहेत, पण आम्ही अशा परिस्थितीतही रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल आयाक केले. रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल-हमास युद्ध असो, जगात जेव्हा जेव्हा युद्ध होते, तेव्हा कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. आम्ही आधीच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

महागाईवर काय म्हणाल्या...देशातील महागाईबाबत प्रश्न विचारला असता निर्मला सीतारामन म्हणाल्या की, टोमॅटो, मैदा, डाळी आणि दैनंदिन गरजेच्या इतर वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार बर्‍याच काळापासून पावले उचलत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात 22 महिने अन्नधान्य महागाई 10 टक्क्यांच्या वर होती आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते काहीही करू शकले नाहीत. भाजप सरकार महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न कत आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGSTजीएसटीPetrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी