शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा कर्मचाऱ्यांना झटका; कोरोनातील १८ महिन्यांचे डीए एरिअर्स देण्यास नकार; निवृत्तांनाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 09:56 IST

केंद्र सरकारने कोविड-१९ साथीच्या काळात आर्थिक संकट लक्षात घेऊन १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळात डीए व डीआर यावर प्रतिबंध घातला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोविड-१९ साथीच्या काळातील १८ महिन्यांच्या महागाई भत्त्याची (डीए) थकबाकी (एरिअर्स) देण्यास केंद्र सरकारने नकार देत मोठा झटका दिला आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई दिलाशाची (डीआर) थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. ५२ लाख कर्मचारी आणि ६० लाख निवृत्तांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. 

केंद्र सरकारने कोविड-१९ साथीच्या काळात आर्थिक संकट लक्षात घेऊन १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळात डीए व डीआर यावर प्रतिबंध घातला होता. जुलै २०२१ मध्ये डीए पुन्हा सुरू करण्यात आला. तथापि, ३ हप्त्यांचा म्हणजेच १८ महिन्यांचा डीए थकीत राहिला होता. सरकारने १ जुलै २०२१ पासून महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ केली होती. त्यामुळे महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के झाला होता.

दर ६ महिन्यांनी होते सुधारणामहागाईच्या प्रमाणात दर ६ महिन्यांनी महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. याचे मोजमाप कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार केले जाते. महागाई भत्ता हा शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रमाणात मिळतो.

अपेक्षा ठरली फोल१ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या १८ महिन्यांच्या काळातील डीए आपल्याला मिळेल, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. डीएमधील वाढही नंतर करण्यात आल्यामुळे मागील काळाचे एरियर कर्मचाऱ्यांना मिळायला हवे होते. तथापि, आता सरकारने ते देण्यास नकार दिला आहे.

काय असतो महागाई भत्ता?महागाई वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना भरपाई म्हणून महागाई भत्ता दिला जातो. सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांनाही भरपाई भत्त्याच्या स्वरूपात दिली जाते. त्याचा मोठा फायदा कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांना होतो.

कसा मोजतात महागाई भत्ता? महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने एक फॉर्म्युला निश्चित केला आहे. हा फॉर्म्युला असा आहे - [(मागील १२ महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी - ११५.७६) ११५.७६] x१००. ज्ञात असावे की सार्वजनिक उपक्रमाच्या डीएसाठी स्वतंत्र फॉर्म्युला वापरला जातो.

वेतनात कशी होते वाढ? समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन २५ हजार रुपये आहे. तर त्याला या २५ हजार रुपयांच्या २८ टक्के डीए मिळेल. डीएमध्ये ११ टक्के वाढ झाली याचा अर्थ २५ हजारांवर ११ टक्क्यांची वाढ मिळेल. म्हणजे वेतनात प्रत्यक्षात २,७५० रुपयांची वाढ होईल.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी