शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकारची रणनीती; पेट्रोल-डिझेलवर लावणार कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 12:25 IST

पाणी संकटाचा सामना करण्यासाठी विविध योजना सरकार आणणार आहे आणि त्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार केंद्र शासन करत आहे.

नवी दिल्ली - देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जर वेळीच केंद्र सरकारने पाण्याबाबत योग्य नीती वापरली नाही तर भविष्यात देशावर बिकट परिस्थिती उद्भवू शकते. त्याच कारणामुळे सरकारने पाणी संकट गांभीर्याने घेतलं आहे. पाणी संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय योजना बनविण्याचं काम सुरु केलं आहे. 

पाणी संकटाचा सामना करण्यासाठी विविध योजना सरकार आणणार आहे आणि त्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार केंद्र शासन करत आहे. या प्रस्तावावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आणि अन्य संस्थांनी सहमती दाखविली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रिपोर्टनुसार पेट्रोल डिझेलवर प्रतिलीटर 30 ते 50 पैसे अतिरिक्त कर लावला जाईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवर 8 रुपये रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स लावण्यात आला होता. यातून जमा होणारी रक्कम रस्त्याच्या विकासकामांसाठी वापरण्याचा सरकारचा विचार होता. 

सध्या तामिळनाडूमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. अशीच परिस्थिती देशाच्या अन्य भागातही होऊ शकते. मात्र अद्यापपर्यंत पाणी संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने कोणतीही ठोस योजना बनविली नाही. पाणी संकटावर मात करण्यासाठी सरकारला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे अन्यथा अनेक भागात दयनीय अवस्था होईल. त्याचमुळे केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत सरकारकडून विविध योजना आणण्याबाबत विचार सुरु आहे. 

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudget 2019अर्थसंकल्प 2019Petrolपेट्रोल