शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"दुसऱ्याचं श्रेय लाटणं खपवून घेतलं जाणार नाही"; गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या 'रोबोट' वादावर सरकारने सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:56 IST

गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या वादावर सरकारने मोठी प्रतिक्रिया दिली.

AI Summit Controversy:दिल्लीत पार पडलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक डॉगवरून निर्माण झालेल्या वादावर आता केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "समिटमध्ये खरे कसब आणि संशोधन दिसणे आवश्यक आहे; चुकीच्या माहितीला किंवा दुसऱ्याचे संशोधन आपले म्हणून सांगण्याच्या वृत्तीला सरकार कधीही प्रोत्साहन देणार नाही," अशा कडक शब्दांत सरकारने या प्रकरणावर भाष्य केले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या वतीने एक रोबोटिक डॉग प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधीने हा रोबोट स्वतः विकसित केल्याचा दावा केला होता. मात्र, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा रोबोट चीनमधून विकत घेतल्याचा आरोप करत युनिव्हर्सिटीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, युनिव्हर्सिटीला समिटमधून आपला स्टॉल तातडीने रिकामा करण्यास सांगण्यात आले.

सरकारची अधिकृत भूमिका

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी एका पत्रकार परिषदेत या वादावर स्पष्टीकरण दिले. "दुसऱ्याचे काम स्वतःचे म्हणून सांगण्याच्या कृतीचे आम्ही समर्थन करत नाही. चुकीची माहिती पसरवणे चुकीचे आहे, म्हणूनच आम्ही या वादापासून लांब राहण्यासाठी युनिव्हर्सिटीला स्टॉल हटवण्यास सांगितले," असं एस. कृष्णन यांनी सांगितले.

सर्टिफिकेशन नाही, केवळ प्रदर्शन

"समिटमध्ये मांडलेल्या वस्तूंना सरकार आधीच प्रमाणपत्र देत नाही. हे एक नाविन्यपूर्ण व्यासपीठ आहे. जेव्हा एखादा संशोधक उत्पादन दाखवतो, तेव्हा त्याला त्याबद्दल पूर्ण माहिती असेल असे गृहीत धरले जाते. जर आम्ही प्रत्येक गोष्टीचे आधीच सर्टिफिकेशन करू लागलो, तर संशोधनावर मर्यादा येतील. सरकारचा उद्देश कोणाच्याही संशोधनाची गळचेपी करण्याचा नाही, मात्र पारदर्शकता असणे आवश्यक आहे," असेही एस. कृष्णन यांनी म्हटले.

गलगोटिया युनिव्हर्सिटीचा माफीनामा

वादानंतर १८ फेब्रुवारी रोजी गलगोटिया युनिव्हर्सिटीने अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी करून जाहीर माफी मागितली आहे. युनिव्हर्सिटीने म्हटले की, "समिटमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्या एका प्रतिनिधीला त्या उत्पादनाची तांत्रिक माहिती नव्हती आणि कॅमेऱ्यासमोर येण्याच्या उत्साहात तिने चुकीची माहिती दिली. वास्तविक, तिला प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे अधिकार दिलेले नव्हते."

English
हिंदी सारांश
Web Title : Government rebukes Galgotias University for robotic dog controversy, plagiarism.

Web Summary : Government slams Galgotias University for falsely claiming credit for a robotic dog at an AI summit. The university apologized after facing accusations of using a Chinese-made robot. The government emphasized the importance of transparency and originality in research, vowing to prevent such incidents.
टॅग्स :delhiदिल्लीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स