शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

"गाय आमची माता, सरकारने प्राण्यांच्या यादीतून बाहेर काढावं"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:43 IST

गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळण्याची मागणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्राकडे केली आहे.

Swami Avimukteshwaranand Saraswati : महाराष्ट्र सरकारने नुकताच देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं महाराष्ट्रातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. त्यानंतर हा प्रस्ताव मान्य करून जीआर जारी करण्यात आला. अशातच आता बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारकडे गायींसंदर्भात एक मागणी केली आहे. गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळण्याची मागणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्राकडे केली आहे. गायीला जनावर म्हणणं चुकीचं असल्याचेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे गौ प्रतिष्ठा ध्वज स्थापन करण्यासाठी भारत भेटीदरम्यान ओडिशामध्ये पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी  गायीला जनावरांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली. सरकारी यादीत गाय हा प्राणी आहे, पण सनातन धर्मात गायीला आईचा दर्जा आहे. त्यामुळे गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळ्यात यावं असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे दीर्घकाळापासून गायींच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. 

"सरकारी यादीत गायीला प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तर भारतीय सभ्यता आणि संस्कृतीत गायीला देवी म्हटले गेले आहे. गायीला माता म्हणत तिचे महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्म मानणारे लोक गायीला गौ माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे. आपली परंपरा आपणच पुढे नेली पाहिजे. यासाठी सरकारने जारी केलेल्या जनावरांच्या यादीतून गाय वगळावी लागणार आहे," असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

"गोमातेचं सरंक्षण आणि संवर्धनासाठी सरकारने कायदा केल्यानंतर लोकांनाही याचं व सनातन धर्माचं गांभीर्य समजेल. त्यामुळे लोकांचा विचार करण्याची पद्धत, गायीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. राहीला मुद्दा गायींची सेवा करण्याचा, त्यांची चांगली काळजी घेण्याचा हे आमचे काम आहे. बाकी सरकारने आधी आपले काम करावे. सरकारने गायीला जनावरांच्या यादीत ठेवले आहे. त्यामुळे लोकही गाईला जनावरासारखे वागवतात," असेही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं.

टॅग्स :cowगायCentral Governmentकेंद्र सरकार