शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकरी आंदोलन संवेदनशीलतेने हाताळावे; शरद पवार यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:02 IST

शरद पवार यांचे प्रतिपादन, देशहितासाठी चांगली बाब नसल्याचे मत

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहायला हवे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केंद्राने करायला हवा. आंदोलनाची स्थिती अशीच कायम राहिली तर देशासाठी ती चांगली बाब ठरणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

शरद पवार यांचे रविवारी येथे आगमन झाले. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी पवार यांची भेट घेतली. आंदोलनावर तोडगा काढण्यास पवारांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती येचुरी यांच्यासही काही नेत्यांनी केली. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांना कोणताही राजकीय पक्ष वा नेता त्यांच्या व्यासपीठावर नको आहे. त्यामुळे तिढा कधी सुटणार हा प्रश्न कायम आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करणार का, या प्रश्नावर शरद पवार यांनीही स्पष्ट काही सांगितले नाही. दिल्ली भेटीत शरद पवार कोणा शेतकरी नेत्यांना वा केंद्रीय मंत्र्यांना भेटणार का, हे समजू शकलेले नाही. 

प्रजासत्ताक दिनासाठी रंगीत तालीमप्रजासत्ताक दिनासाठी रंगीत तालीमसरकार कायदे मागे घेणार नसेल, तर जागचे हलणार नाही, हे शेतकऱ्यांकडून दररोज सांगितले जात आहे. त्याशिवाय सरकारचा निषेध म्हणून प्रजासत्ताक दिनी राजपथवर ताबा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू आहेत. चिल्ला सीमेवर शेतकऱ्यांनी त्याची रंगीत तालीमही सुरू केली आहे.

ही परिस्थिती अजिबातच भूषणावह आणि देशहिताची नाही- पवार

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन लवकर संपावे यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी गांभीर्याने विचार करायला हवा. आतापर्यंत चार-पाच आंदोलकांनी आत्महत्या केल्या आहेत. ही परिस्थिती अजिबातच भूषणावह आणि देशहिताची नाही.

यूपीएच्या अध्यक्षपदात रस नाही

यूपीएच्या अध्यक्षपदात आपल्याला अजिबात रस नाही, असे पवार यांनी पुन्हा एकवार स्पष्ट केले. ‘मला त्यात रस नाही. त्यासाठी वेळही नाही’, असे सांगून पवार म्हणाले की, ‘मला न विचारताच ही चर्चा सुरू करण्यात आली आहे’. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानांमुळे ही चर्चा सुरू झाली होती. 

उद्या चर्चेची सातवी फेरीकेंद्राने केलेले तीनही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, या मागणीसाठी गेल्या ३३ दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात बुधवारी, ३० डिसेंबर रोजी चर्चेची सातवी फेरी पार पडणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपा