शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 04:49 IST

रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

नागपूर : देशातील जनतेने भाजप सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे. २०१४ च्या तुलनेत अधिक जागा निवडून दिल्या आहेत. याचाच अर्थ जनतेच्या काही अपेक्षा या सरकारने पूर्ण केल्या होत्या तर काही अपूर्ण आहेत. अपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच जनतेने पुन्हा संधी दिली आहे. तेव्हा सरकारने जबाबदारीने त्या पूर्ण केल्याच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानात पार पडला. स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला पू. चित्तरंजन जी महाराज (आगरतळा), कृष. गोपालकृष्ण जी (बंगळुरु). यशराज व युवराज (दिल्ली), डॉ. कृष्णास्वामी (कोईम्बतुर), पाचीपाला दोरा स्वामी, रमेश (जालंधर) आणि श्री हासन वासजी ढेम्पो (गोवा) हे प्रमुख अतिथी होते.नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे पहिल्यांदाच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे ते काय बोलतात, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. त्यांनी, सरकारने कुठल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हे स्पष्टपणे सांगितले नाही. परंतु ते म्हणाले, देशातील मतदार हे पहिल्या निवडणुकीपासून काही ना काही शिकत आले आहेत. मतदार आता अधिक जागरुक झाले आहेत.देशाची अखंडता, एकता, विकास आणि पारदर्शकतेला ते मतदान करू लागले आहेत. तेव्हा निवडणुकीत त्यांना आता फसवता येऊ शकत नाही. ही बाब सर्वच राजकीय पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी दिला. २५ दिवसीय शिबिरात देशभरातील ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले.पश्चिम बंगालची परिस्थिती देशासाठी घातकनिवडणुकीमध्ये स्पर्धा असते. निवडून येण्यासाठी बरेच काही बोलले जाते. परंतु निवडणूक संपली की स्पर्धा संपते. संसदेत निवडून येणाºया सर्वपक्षीय लोकांनी देशासाठी मिळून काम करायचे असते. जिंकणाºयाने गुर्मीत राहिले आणि हरणाºयाने संतापात राहिले तर देशाचे काय होईल. पश्चिम बंगालमध्ये सध्या तेच सुरू आहे. खुर्चीचा मोहभंग किती हादरवून सोडतो. बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली भाषा यायला हवी, अशी भाषा योग्य नाही. देशासाठी हे घातक आहे, असे ते म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही दिला होता इशाराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सांगितले होते की, आपल्या देशाला कुणी ताकदीच्या जोरावर जिंकले नाही, तर आपण आपसात लढल्यामुळेच त्यांना आपल्याला जिंकता आले, हा इतिहास आहे, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ