शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत नियमित का येत नाहीस? छडीनं, लाथेनं शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 14:38 IST

मारहाण करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी; सोशल मीडियावर संताप व्यक्त

कुड्डलोर: शाळेत नियमित येत नसल्यानं शिक्षकांनी विद्यार्थ्यांला मारहाण केल्याची घटना तमिळनाडूतील शाळेत घडली आहे. शिक्षक एका विद्यार्थ्याला छडीनं आणि लाथेनं मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विद्यार्थी गयावया करताना दिसत आहे.

कुड्डलोर जिल्ह्यातल्या चिदंबरममध्ये नंदानार शाळा आहे. या शाळेत सहावी ते बारावीत ५०० हून अधिक विद्यार्थी शिकतात. बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला भरवर्गात बेदम मारलं. शाळेत नियमित येत नसल्यानं शिक्षकांनी विद्यार्थ्याला छडीनं, लाथेनं मारहाण केली. विद्यार्थी गयावया करत असतानाही शिक्षक त्याला सतत मारहाण करत होते. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत असताना त्याच वर्गातील एका विद्यार्थ्यानं हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून शिक्षकांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.