शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 09:05 IST

प्रत्येक 40 घरांसाठी एक अशा पद्धतीने सार्वजनिक बंकर्सचे नियोजन करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर: पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे येथील अनेक गावांतील लोकांचा नाहक बळी जातो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात तब्बल 14,000 बंकर्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सांबा, पुंछ, जम्मू, कटुआ आणि राजौरी परिसराचा समावेश आहे. पाकिस्तानकडून करण्यात येणारा गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यामुळे हा परिसर सर्वाधिक वेळा लक्ष्य केला जातो. त्यामुळे येथील नागरिक गंभीररित्या जखमी होण्याचे प्रकार सर्रास घडतात, अनेकांचा तर जीवही जातो. ही परिस्थिती लक्षात घेता सरकारने आपातकालीन परिस्थितीत नागरिकांना लपण्यासाठी मोठ्याप्रमाणावर बंकर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 13,029 बंकर्स हे नागरिकांच्या घरासमोर उभारण्यात येतील तर उर्वरित 1,431 बंकर्स हे सार्वजनिक स्वरूपाचे असतील. या बंकर्सचे क्षेत्रफळ साधारण 800 स्क्वेअर फूट इतके असेल. प्रत्येक 40 घरांसाठी एक अशा पद्धतीने सार्वजनिक बंकर्सचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा झाल्यास नागरिक याठिकाणी सुरक्षित राहू शकतील. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात 2017मध्ये  19 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. याशिवाय हल्ल्यांमध्ये सीमेवरील गावांमधील 12 नागरिक ठार झाले होते, तर 79 जण जखमी झाले होते. याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने सीमावर्ती भागांमध्ये बंकर्स उभारण्याचा 416 कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. या बंकर्सचे काही सुटे भाग कारखान्यात तयार करण्यात येतील. हे भाग ट्रेलर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने संबंधित गावांमध्ये नेले जातील आणि त्याठिकाणी बसवले जातील. प्रत्येक बंकरची 2 ते 3 दिवसांत उभारणी करण्याचे लक्ष्य आम्ही समोर ठेवल्याची माहिती बंकर उभारणीचे कंत्राट देण्यात आलेल्या एनबीसीसीने सांगितले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानBunkersबंकर्स