शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आता UPSC परीक्षा पास न करता बनता येणार ऑफिसर, मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 17:04 IST

मोदी सरकारनं नोकरशाहांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला  UPSC परीक्षा उत्तीर्ण न करताही अधिकारी बनता येणार आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकारनं नोकरदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला  UPSC परीक्षा उत्तीर्ण न करताही अधिकारी बनता येणार आहे. आता वरिष्ठ अधिकारी बनवण्यासाठी यूपीएससीची सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं नाही. तसेच खासगी कंपनीत काम करणा-या नोकरदारांनाही मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. या निर्णयाबाबतची अधिसूचना मोदी सरकारनं जारी केली आहे.कार्मिक व प्रशिक्षण विभागासाठी या पदांवर नियुक्त करण्याच्या अधिका-यांसाठी विस्तार स्वरूपात मार्गदर्शिकेसह अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे सरकारला आता सेवा नियमातही बदल करावा लागणार आहे. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, सद्यस्थितीत या निर्णयामुळे कर्तृत्ववानांना योग्य संधी मिळणार आहे. भारतीय नागरिकांना स्वतःची प्रतिभा आणि क्षमता दाखवता यावी, यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच या अधिका-यांना तीन वर्षं संधी देण्यात येणार आहे. डीओपीटीनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील जॉइंट सेक्रेटरीच्या पदावर नियुक्ती होणार आहे. तसेच नवनियुक्त अधिका-यांना 3 वर्षं काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांची कामगिरी पाहून त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे. या पदांसाठीच्या अर्जांना वयाची अट शिथिल करण्यात आली असून, तुम्ही 40 वर्षांपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकता. तसेच या अधिका-यांचं वेतनही सहसचिवाएवढं असून, त्यांना इतर वरिष्ठ अधिका-यांसारख्याच सुविधा मिळणार आहेत. या अधिका-यांची मुलाखत मंत्रिमंडळ सचिवाच्या नेतृत्वाखाली कमिटी घेणार आहे. पदवीधर, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती,  खासगी कंपनीतील व्यक्तीही यासाठी अर्ज करू शकतो. फक्त त्याला त्याच्या क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव हवा. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी