शीलेश शर्मा, नवी दिल्लीकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन...’बाबत केलेल्या टिपणीवरून काँग्रेसने आक्रमक होत मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांवर घणाघात केला.‘खुब ठगा हैं यारों ने, झुठे झुठे नारों ने...असे सांगत काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी आकडेवारी देत मोदी सरकार किती खोटे बोलते, याचा पर्दाफाश केला.निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा वायदा केला. याच आश्वासनावर सत्ता मिळविली. हे सरकार खोटे बोलून जनतेचा अपमान करीत आहे. जनतेला फसविले आहे.दोन कोटी रोजगार देण्याचा वायदा केला होता. युवक रोजगारासाठी संघर्ष करीत आहेत. जीडीपीची चुकीची आकडेवारी देत खोट्या विकासाचा मार्ग दाखविला जात आहे. जन-धन योजनेमागील सत्यही माहिती अधिकारातहत बँकांकडून उत्तरादाखल मिळालेल्या माहितीतून उघड झाले आहे. ग्रामीण विद्युतीकरणाची घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली होती. फटेला गावानेच काही तासांत ही घोषणा फोल ठरविली. दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे; परंतु मोदी सरकार कोणतेही आश्वासन प्रामाणिकपणे पूर्ण करू शकले नाही. आजही केवळ खोटारडे राजकारण करीत आहे.
सरकार खोटे बोलते; काँग्रेसचा घणाघात
By admin | Updated: September 15, 2016 02:55 IST