शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
2
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
3
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
4
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
5
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
6
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
7
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
8
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
9
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
10
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
11
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
12
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
13
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
14
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
15
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
16
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
17
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
18
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
19
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
20
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?

दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:13 IST

बीएसएफ क्रीडा कोट्याअंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदासाठी अर्ज स्वीकारत आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता.

दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. भारतीय लष्करामध्ये ३९१ पदांसाठी भरती निघाली आहे.  सीमा सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत आयोजित केली आहे. कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. 

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 391 कॉन्स्टेबल (GD) पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...

पगार किती मिळणार?

कॉन्स्टेबल (GD) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये दरम्यान वेतन दिले जाईल.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २३ वर्षे आहे. विशेष श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट देखील उपलब्ध आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयात ५ वर्षांची सूट मिळेल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षांची सूट मिळेल.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवारांनी गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय खेळात प्रतिनिधित्व केलेले असणे किंवा पदक जिंकलेले असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. सामान्य आणि ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १५९ रुपये आहे.

ऑनलाइन अर्ज असा करा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, आधी अधिकृत वेबसाइट, rectt.bsf.qov.in ला भेट द्या.

त्यानंतर, वेबसाइटच्या होमपेजवरील ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.अर्ज लिंकवर क्लिक केल्यानंतर, आवश्यक माहिती भरा.आता, तुमची शैक्षणिक पात्रता त्यात भरा आणि विहित अर्ज शुल्क भरा.शेवटी, फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Job Opportunity: 391 Constable GD Posts for 10th Pass!

Web Summary : Great news for 10th pass youth! Border Security Force (BSF) offers 391 Constable GD posts under sports quota. Apply online by November 4, 2025. Salary ranges from ₹21,700 to ₹69,100. Age limit: 18-23 years. Visit rectt.bsf.qov.in for details.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjobनोकरी