शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

चीनवर आणखी एक 'डिजिटल स्ट्राईक', मोदी सरकारकडून ४३ ऍप्स बॅन; पाहा संपूर्ण यादी

By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 5:36 PM

government of india blocks 43 mobile apps: देशाच्या सुरक्षेचा विचार करून माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली: मोदी सरकारनं ४३ मोबाईल ऍप्सवर बंदीची कारवाई केली आहे. देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी ऍप्सवर बंदीची कारवाई करण्यात आल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या अधिनियम ६९ ए अंतर्गत सरकारनं ही कारवाई केली आहे. याआधी सरकारनं चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालय आणि सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटरकडून मिळालेल्या अहवालांनंतर सरकारनं ऍप्स बंदीचं पाऊल उचललं. मोदी सरकारनं बॅन केलेल्या ऍप्समध्ये बहुतांश ऍप्स चिनी आहेत. यामध्ये अलीबाबा वर्कबेंच, अली पे कॅशियर, डिलिव्हरी ऍप लालमोव इंडिया, स्नॅक व्हिडीओसारख्या ऍप्सचा समावेश आहे. मोदी सरकारनं कारवाई केलेले काही ऍप्स जुने आहेत. तर बरेचसे ऍप्स सपोर्टिव्ह आहेत.अली बाबाचे काही ऍप्स याआधीच बंद करण्यात आले. आता अली बाबाच्या सपोर्टिंग ऍप्सवर बंदीची कारवाई झाली आहे. यामध्ये AliSuppliers, AliExpress आणि AliPay Cashier चा समावेश आहे. बंदीची कारवाई झालेले बरेचसे ऍप फारसे लोकप्रिय नाहीत. या ऍप्सना पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलं आहे की त्यांना प्ले स्टोरमधून हटवलं जाणार आहे, याबद्दलची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.या ऍप्सवर सरकारनं घातली बंदी-1. AliSuppliers Mobile App2. Alibaba Workbench3. AliExpress - Smarter Shopping, Better Living4. Alipay Cashier5. Lalamove India - Delivery App6. Drive with Lalamove India7. Snack Video8. CamCard - Business Card Reader 9. CamCard - BCR (Western)10. Soul- Follow the soul to find you11. Chinese Social - Free Online Dating Video App & Chat12. Date in Asia - Dating & Chat For Asian Singles13. We Date-Dating App14. Free dating app- Singol, start your date!15. Adore App16. TrulyChinese - Chinese Dating App17. TrulyAsian - Asian Dating App18. ChinaLove: dating app for Chinese singles19. DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online20. AsianDate: find Asian singles21. FlirtWish: chat with singles22. Guys Only Dating: Gay Chat23. Tubit: Live Streams24. We Work China25. First Love Live- super hot live beauties live online26. Rela - Lesbian Social Network27. Cashier Wallet28. MangoTV29. MGTV- HunanTV official TV APP30. WeTV - TV version31. WeTV - Cdrama, Kdrama&More32. WeTV Lite33. Lucky Live- Live Video Streaming App34. Taobao Live35. DingTalk36. Identity V37. Isoland 2: Ashes of Time38. BoxStar (Early Access)39. Heroes Evolved40. Happy Fish41. Jellipop Match- Decorate your dream island!42. Munchkin Match: magic home building43. Conquista Online II