शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत विमान प्रवासासाठी आता सरकारी ओळखपत्र बंधनकारक; केंद्र सरकार जाहीर करणार नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:58 IST

विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं आहे.

ठळक मुद्दे विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं आहे.देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्राइव्हिग लायसन्स), पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक. ८ सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे.

नवी दिल्ली, दि. 7- विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं असणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्राइव्हिग लायसन्स), पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. ८ सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. यामध्ये मतदान ओळखपत्राचा क्रमांकही चालू शकतो, पण त्याबाबतचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.

भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार करण्यात येत असून, हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा नियम करण्यात आला आहे. या नवीन नियमामुळे एका व्यक्तीच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती प्रवास कऱण्याच्या घटना रोखल्या जाऊ शकतील, असं केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले आहेत.  नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम मंगोलिया येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लोबल रेग्युलेटर्स’च्या बैठकीला उपस्थित होती. त्याठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचंही जयंत सिन्हा म्हणाले आहेत.

'नो फ्लाय'च्या नियमांबाबत आमच्याकडे काही सूचना आल्या होत्या. त्याबाबत योग्य तो विचार करुन देशांतर्गत प्रवासाबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती जयंत सिन्हा यांनी दिली आहे. याशिवाय देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकिट काढताना आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या प्रवाशांना लवकर डिजिटल बोर्डिंग पास देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढताना यापुढे सरकारी ओळखपत्र स्वतःकडे ठेवणं बंधनकारक असणार आहे. 

टॅग्स :Travelप्रवास