शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सरकार स्थापन करण्याआधी मतैक्य हवे, एनडीएचा मित्रपक्ष अजसूने व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 04:36 IST

महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर अजसूचे मुख्य प्रवक्ते देवदर्शन भगत म्हणाले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिला हक्क मिळावा.

रांची : अडचणीची स्थिती टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्याआधी मतैक्य करायला हवे, असे मत झारखंडमधील भाजपप्रणीत एनडीए सरकारमधील अखिल झारखंड स्टुडंट युनियन (अजसू) या मित्र पक्षाने े केले आहे.महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर अजसूचे मुख्य प्रवक्ते देवदर्शन भगत म्हणाले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिला हक्क मिळावा.जनतेने दिलेल्या कौलाचा आदर केला जावा. तत्त्व, विचारधारा वेगवेगळ्या असलेल्या पक्षांनी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याआधी सहमती घेतली पाहिजे; जेणेकरुन ऐनवेळी अडचण निर्माण होणार नाही. सरकार चालविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक बाबीं अगोदर निश्चित केल्या गेल्या पाहिजेत, असे भगत यांनी सांगितले. १९ वर्षांपूर्वी झारखंडची निर्मिती झाल्यापासून अखिल झारखंड स्टुडंट युनियन (अजसू) पहिल्यांदाच स्वबळावर झारखंड विधानसभेची निवडणूक लढवित आहे. झारखंडची निर्मिती होण्याआधी स्थापन झालेल्या अखिल झारखंड स्टुडंट युनियनने (अजसू) सुरुवातीपासून राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केलेली आहे. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान पाच टप्प्यांत झारखंडमध्ये विधानसभेसाठी निवडणूक घेण्यात येणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यांत विविध राजकीय पक्षांचे २६० उमेदवार रिंगणात आहेत. दुसºया टप्प्यात २० जागांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.आठ कोटींची रोकड जप्त...दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यापासून झारखंडमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत ८ कोटी ३३ लाख ५३ हजार ९५८ रुपयांची रोकड , तसेच अवैध दारू, गांजासह अनेक साहित्य-सामग्री जप्त करण्यात आली. याप्रकरणी ६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य निर्वाचन अधिकारी विनय कुमार चौबे यांनी मंगळवारी दिली. 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाPoliticsराजकारण