शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शाहीनबागमधील आंदोलकांशी चर्चा करण्यास अखेर सरकार तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 11:21 IST

शाहीनबाग येथील रस्त्यावर अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांनी ठिय्या दिला असून, या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे.

ठळक मुद्देशाहीनबाग येथील रस्त्यावर अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांनी ठिय्या दिला असून, या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. आंदोलकांशी चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली

नवी दिल्ली - नुकताच अमलात आलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि प्रस्तावित एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या 45 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शाहीनबाग येथील रस्त्यावर अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांनी ठिय्या दिला असून, या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. त्या पार्श्वभूमीरवर येथील आंदोलकांशी चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार झाले आहे. कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकार शाहीनबागमधील आंदोललकांशी चर्चा करून त्यांच्या शंकाचे निरसन करण्यास तयार आहे. मात्र त्याआधी शाहीनबाग येथे आंदोलन करत असलेले आंदोलक चर्चेसाठी झाले पाहिजेत.  कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीती ही माहिती दिली. यावेळी शाहीनबाग आंदोलनाशी संबंधित असलेले काही प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. यावेळी आतापर्यंत सरकारने चर्चेसाठी प्रयत्न का केले नाहीत, अशी विचारणा संबंधित प्रतिनिधींनी रविशंकर प्रसाद यांच्याकडे केली. त्यावेळी सरकार चर्चेला कायम तयार आहे मात्र शाहीनबाग आंदोलनाशी संबंधिक काही नेते सीएए मागे घेतला जात नाही तोपर्यंत चर्चा करता येणार नाही असे सांगत असतात. त्यामुळे आंदोलकांकडून चर्चेचा प्रस्ताव आल्यास चर्चा नक्कीच होईल. मात्र आंदोलनस्थळीच बसून चर्चा होईल, असा आग्रह आंदोलकांनी धरल्यास चर्चा होणे कठीण आहे, असेही रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

 दरम्यान, सीएएला विरोध होत नाही आहे, पण अमित शाह यांनी एनआरसीबाबत केलेल्या विधानामुळे चिंता वाढली आहे, असा प्रश्न केला असता रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, एनआरसीबाबत भीती व्यक्त करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रामलीला मैदानावरील भाषण ऐकले पाहिजे. त्यात एनआरसीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. दरम्यान, आंदोलनाशी संबंधित लोकच सीएएबाबत कुठलाही आक्षेप नसल्याचे सांगत आहेत, ही आनंदाची बाब आहे, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.  

शाहीनबाग : आंदोलनाला महिना पूर्ण, मागे हटण्यास महिलांचा नकार

शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळा

CAA : ''सीएए' म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग' 

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुमारे दीड महिन्यापासून दिल्लीत शाहीनबाग येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असतानाच शाहीनबागमध्ये आंदोलकांनी ध्वजारोहण केले. राजपथवर प्रजासत्ताक दिन सोहळा पाहण्यासाठी जाणाऱ्या दिल्लीकरांप्रमाणेच शाहीनबागमध्येही प्रचंड उत्साही वातावरण होते.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकार