शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

चार वर्षांत भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यात सरकार अपयशी, अण्णांचा नरेंद्र मोदींवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 17:37 IST

तीन दिवसांपासून अण्णा हजारे राजधानीतल्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

नवी दिल्ली- गेल्या तीन दिवसांपासून अण्णा हजारे राजधानीतल्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु तरीही अण्णांच्या उपोषणाची भाजपा सरकारनं गांभीर्यानं दखल घेतलेली नाही. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत अण्णांनी जनतेशी संवाद साधला आहे.ते म्हणाले, सरकार वचन पाळत नसून जनतेला फक्त आश्वासनं देते, चार वर्षांत भ्रष्टाचारमुक्त भारत बनवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. अण्णांशी चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीत दाखल झाले आहेत. गिरीश महाजन लवकरच रामलीला मैदानावर जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.अण्णांच्या उपोषणाचा दुसरा दिवस लक्षणीय ठरला होता. त्या दिवशी ‘नो लोकपाल, नो मोदी’ या घोषणाबाजी देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लोकपाल नियुक्त करा, या मागण्या केल्या गेल्या. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणा-या शेतक-यांची संख्या यंदा लक्षणीय आहे. अण्णा म्हणाले होते, पंजाब, हरयाणातून येणा-या शेतक-यांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या बसेस अडवण्यात येत आहेत. आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अण्णांनी केली होती.आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार आहे. जनतेला न्याय मिळत नाही, तेव्हा आंदोलन होते. अहिंसक मार्गाने असलेले हे आंदोलन कुठलाही पक्ष, वा व्यक्तीच्या विरोधात नाही, देशाच्या भल्यासाठी आहे. सरकारशी बोलणी सुरू आहेत. सरकार काही कागदपत्रे पाठवणार आहे. त्यांचा अभ्यास करून, पुढची दिशा ठरवू. मागण्या मान्य करायला सरकार तयार असेल तर आम्हाला आंदोलन करण्यात आनंद नाही, असे अण्णा म्हणाले.  जनलोकपाल आणि सोबतच इतर मागण्यांसाठी अण्णा 23 मार्चपासून उपोषणाला बसले आहेत.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNew Delhiनवी दिल्ली