शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, 1 जुलैपासून होणार लागू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 21:03 IST

केंद्र सरकारनं कर्मचा-यांना एक खूशखबर दिली आहे. केंद्रानं कर्मचारी व सेवानिवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 1 टक्क्यानं वाढ केली असून, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांना मिळणारा महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर जाणार आहे.

नवी दिल्ली, दि. 12 - केंद्र सरकारनं कर्मचा-यांना एक खूशखबर दिली आहे. केंद्रानं कर्मचारी व सेवानिवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 1 टक्क्यानं वाढ केली असून, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांना मिळणारा महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर जाणार आहे. 1 जुलैपासून  हा नवा नियम लागू होणार आहे.केंद्राच्या या निर्णयाचा 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 61 लाख सेवानिवृत्त वेतनधारकांना फायदा पोहोचणार असून, कर्मचा-यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे. केंद्रानं महागाई भत्ता एका टक्क्यानं वाढवल्यामुळे आता कर्मचा-यांना मूळ वेतन 5 टक्क्यांनी वाढून मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (8 महिन्यांच्या) जुलै 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनासुद्धा याची भरपाई देण्यात येणार असून, सरकारी तिजोरीवर 3,068.26 व 2,045.50 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए जुलै 2016 पासून 2 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करण्याच्या तयारीत होती. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेस आला. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला.महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवावाकेंद्रीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष के. के. कुट्टी यांनी सांगितले की, ‘औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक मूल्यांक निर्देशांकाच्या बारा महिन्यांच्या सरासरीनुसार (1 जुलै 2015 ते 30 जून 2016) महागाई भत्ता 2.92 टक्के होतो. त्यामुळे कर्मचारी संघटना 3 टक्के महागाई भत्त्यासाठी आग्रही आहेत.