शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

'सरकारला अर्थव्यवस्थेबद्दल टीका ऐकून घेण्याची इच्छा नाही'; उद्योग विश्वातून नाराजीचे सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 08:16 IST

उद्योगपती राहुल बजाज यांच्यानंतर किरण मझूमदार शॉ यांची टीका

मुंबई: उद्योगपती राहुल बजाज यांच्यानंतर आता बायोकॉनच्या व्यवस्थापकीय संचालिका किरण मझूमदार शॉ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विकासदर उंचावण्यासाठी सरकार भारतीय उद्योग विश्वाशी संपर्क साधेल, अशी अपेक्षा शॉ यांनी व्यक्त केली आहे. सरकार उद्योग जगतापासून अंतर राखतंय आणि त्यांना अर्थव्यवस्थेसंदर्भात कोणतीही टीका ऐकून घ्यायची नाही, अशा शब्दांमध्ये शॉ यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व्यासपीठावर असताना त्यांनी सडेतोड शब्दांत भूमिका मांडली. देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे. त्यावर काही बोलले, टीका केली तर ती योग्य पद्धतीनं घेतली जाणार नाही, अशी भीती कॉर्पोरेट जगताला वाटते. या सर्व परिस्थितीवर आपण मात करायला हवी, असं राहुल बजाज म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वाधिक टीका आमच्यावर झालेली आहे. त्यामुळे कोणीही घाबरायची गरज नाही. हे सरकार अत्यंत पारदर्शीपणे काम करत आहे, असं स्पष्ट केलं.मुंबईत उद्योग जगतातील एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या या सोहळ्यात मुख्य भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना सर्व मंत्र्यांनी उत्तरं दिली. त्यावेळी आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, पण एक परिस्थिती मांडायची आहे, असं म्हणत राहुल बजाज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. मी जन्मत:च व्यवस्थाविरोधी आहे. आपल्याला आवडणार नाही तरी सांगतो की, माझं राहुल हे नाव जवाहरलाल नेहरू यांनी ठेवलं आहे, अशी प्रस्तावना करत बजाज यांनी नथुराम गोडसे याचा देशभक्त असा उल्लेख झाल्याचा संदर्भ देत खंत व्यक्त केली. त्यावर अमित शहा यांनी, साध्वी प्रज्ञासिंह यांनी याबद्दल खुलासा केला असून संसदेत माफीदेखील मागितली आहे, असं स्पष्ट केलं आहे.यूपीए दोनच्या काळात सरकारवर आम्ही काहीही टीका करत होतो. पण आता तशी परिस्थिती नाही. सरकारवर केलेली टीका योग्य अर्थानं घेतली जाणार नाही, अशी भीती कॉर्पोरेट जगाला वाटते, हे कोणी बोलून दाखवणार नाही, पण मी सांगतो, असं बजाज म्हणाले. त्यावर शहा यांनी कोणीही टीका करायला घाबरू नये. तशी काही परिस्थिती नाही, असा खुलासा केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा