शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

रोखीकरण योजनेवरून सरकारची घरातूनच कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 06:11 IST

आरएसएसशी संबंधित संघटना नाराज; मजदूर संघ निदर्शने करणार

ठळक मुद्दे “औषध निर्मात्या कंपन्यांनी किती नफा कमवावा यावर कोणाचे नियंत्रण नाही. जर सरकार एक देश, एक कर असे म्हणते तर मग पेट्रोलला जीएसटीच्या आत का नाही आणत? तसे झाल्यास त्याच्या रोज वाढणाऱ्या किमतीतून सामान्यांची सुटका होईल. 

नवी दिल्ली : नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन (एनएमपी-राष्ट्रीय रोखीकरण कार्यक्रम) कार्यक्रमावरून विरोधी पक्षांकडून होणाऱ्या विरोधाला तोंड देत असलेल्या केंद्र सरकारवरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय मजदूर संघ निदर्शने करणार आहे तर सरकारी संपत्ती खासगी हातात जात असल्याबद्दल स्वदेशी जागरण मंचने सरकारला इशारा दिला आहे. भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) राष्ट्रीय कार्यकारिणीने वाढत्या महागाईविरोधात प्रस्ताव संमत करून सरकारने ती रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी केली.

देशातील सगळ्यात मोठ्या मजूर संघटनांपैकी एक बीएमएसचे महासचिव विनय कुमार सिन्हा म्हणाले की, “'कोरोनानंतर स्थिती वाईट झाली आहे. नोकऱीवरून काढून टाकणे आणि वेतन कपातीचा सगळ्यात जास्त फटका मजुरांना बसला आहे आणि महागाई तर वाढतच चालली आहे.”केंद्र सरकारने उचललेल्या पावलांवरून असंतुष्ट आणि नाखुश असलेल्या बीएमएसने ९ सप्टेंबर रोजी महागाई विरोधात देशव्यापी निदर्शनांची घोषणा केली आहे. बीएमएसने सरकारने उत्पादनाच्या लेबलवर उत्पादन खर्च दिला जावा अशी तरतूद केली पाहिजे म्हणजे कंपन्या किती नफा कमावत आहेत हे जनतेला समजेल, अशी मागणीही केली आहे.सिन्हा म्हणतात की, “औषध निर्मात्या कंपन्यांनी किती नफा कमवावा यावर कोणाचे नियंत्रण नाही. जर सरकार एक देश, एक कर असे म्हणते तर मग पेट्रोलला जीएसटीच्या आत का नाही आणत? तसे झाल्यास त्याच्या रोज वाढणाऱ्या किमतीतून सामान्यांची सुटका होईल. सरकारने उत्पन्न वाढवण्यासाठी इतर काही पर्यायांवर विचार केला पाहिजे.”

संपत्ती विकत नाही आहोत

n    गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ६ लाख कोटी रूपयांच्या राष्ट्रीय मौद्रीकरण योजनेची (एनएमपी) घोषणा केली होती. त्यानुसार वर्ष २०२२ ते २०२५ दरम्यान रेल्वे, रस्ते आणि वीज क्षेत्रात  पायाभूत सुविधा संपत्तीचे रोखीकरण केले जाईल. n    या योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्टेडीयम, २५ विमानतळे आणि १६० खाण प्रकल्प मॉनिटाईज केले जातील. सीतारामन यांनी निवेदनात म्हटले होते की, “या सगळ्या संपत्तींवर मालकी हक्क सरकारचा राहीलच. आम्ही काहीही विकत नाही. एका वेळेनंतर ही सगळी संपत्ती परत मिळेल.”

निदर्शने करणार : बीएमएसने दोन नोव्हेंबर रोजी नॅशनल मॉनिटायझेशन कार्यक्रमाविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याची घोषणा केली तसेच स्वदेशी जागरण मंचनेही केंद्र सरकारच्या या कार्यक्रमावर टीका करून सरकारी संपत्ती खासगी हातांत जात असल्याबद्दल इशारा दिला आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघGovernmentसरकार