शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची अट, प्रवाशांसाठी संकट? फायझर आणि मॉडर्ना लसीची खरेदी रोखली जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 14:00 IST

कोविशील्ड लसीचे निर्माते सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्टोबरमध्ये २२ कोटी डोस उत्पादित करण्याची तयारी दर्शवली आहे.

परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी बॅड न्यूज आहे. फायझर बायोएन्टेक आणि मॉडर्ना या लसींच्या खरेदीला केंद्र सरकारने नकार दर्शवला असल्याचे समजते. या दोन्ही लसींच्या निर्मात्यांनी काही अटींवर भारतात येण्याचे मान्य केले होते. मात्र, कोविशील्ड लसीचे उत्पादन वाढल्याने या दोन्ही लसींची गरज नसल्याचे केंद्राचे मत असल्याचे समजते.

सीरमने उत्पादन वाढवले --  कोविशील्ड लसीचे निर्माते सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्टोबरमध्ये २२ कोटी डोस उत्पादित करण्याची तयारी दर्शवली आहे.-  भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लसीचेही उत्पादन वाढवले जाणार आहे. त्यामुळे फायझर बायोएन्टेक आणि मॉडर्न या दोन लसींना नकार देण्याचे केंद्र सरकारने ठरवल्याचे समजते. -  खासगी कंपन्यांशी फायझर आणि मॉडर्ना करार करून भारतात वितरण करू शकणार आहेत.

सशर्त प्रवेशाला नकार-  भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी फायझर बायोएन्टेक आणि मॉडर्नाच्या निर्मात्यांनी केंद्र सरकारला काही अटी घातल्या होत्या.-  दुर्दैवाने लसीच्या दुष्परिणामामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी लसनिर्माते जबाबदार राहणार नाहीत, त्याचे उत्तरदायित्व केंद्राने स्वीकारावे, असे या कंपन्यांचे म्हणणे होते.-  केंद्र सरकारने या अटी धुडकावून लावल्या होत्या.

 प्रवाशांच्या अडचणींत वाढ होणारफायझर आणि मॉडर्नाच्या प्रवेशबंदीमुळे भारतातून परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांच्या अडचणींत वाढ होणार आहे.ब्रिटन आणि काही युरोपीय देशांमध्ये फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, ॲस्ट्राझेनेकाची व्हॅक्सझेवरिया या लसींचे डोस घेतलेल्यांनाच लसवंत म्हणून ओळखले जाते.या अटीमुळे काही पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या आणि कोविशील्ड लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार