शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मिशन@२०२४ : मोदी सरकारने मंत्र्यांकडून मागवले रिपोर्ट कार्ड, स्मृती इराणींना मिळाली 'ही' जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 16:49 IST

पाच महिन्यांनी होणार्‍या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

नवी दिल्ली : यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच पूर्ण तयारी केली आहे. पाच महिन्यांनी होणार्‍या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्व मंत्र्यांच्या कामाचा तपशील मागवला आहे. सरकारच्या वतीने, मंत्र्यांना त्यांच्या संबंधित मंत्रालयांच्या योजना आणि उपलब्धींची संपूर्ण माहिती पाठविण्यास सांगितले आहे, ज्या जनतेशी संबंधित आहेत. केंद्र सरकारने आपल्या सर्व मंत्र्यांना गेल्या पाच वर्षांत आपल्या मंत्रालयाच्या प्रत्येक योजनेतून जनतेला किती फायदा झाला? याचा तपशील पाठवण्यास सांगितले आहे. 

मंत्रालयाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाभ घेतलेल्या लोकांच्या संख्येची आकडेवारीही सादर करावी, असे स्पष्ट निर्देश मोदी सरकारने दिले आहेत. यासोबतच, सरकारने आपल्या मंत्र्यांना जनतेच्या फायद्यासाठी त्यांच्या मंत्रालयात आणखी कोणत्या नवीन योजना आणता येतील अशी विचारणा केली आहे. सरकारने त्याचा मसुदाही मागवला आहे. सरकारने सर्व मंत्र्यांना हे सर्व तपशील लवकरात लवकर पाठवण्यास सांगितले आहे.

स्मृती इराणी यांच्याकडे जबाबदारी केंद्र सरकारने आपल्या कल्याणकारी योजनांबद्दल जनतेचा अभिप्राय घेण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सर्व मंत्रालयांकडून तपशील प्राप्त केल्यानंतर २०२४ च्या जाहीरनाम्यात आणि सरकारच्या उपलब्धींच्या पुस्तिकेत त्याचा समावेश करणे हा त्यामागील उद्देश आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती इराणी सर्व मंत्र्यांकडून मिळालेला तपशील केंद्र सरकारकडे सुपूर्द करतील, ज्याच्या आधारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवीन योजना जाहीर केल्या जातील किंवा त्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जातील. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा