शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायात मिळाले अफाट यश; आता तिरुपती बालाजी मंदिरात करणार १४० कोटींचे दान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:53 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, एक भाविक बालाजी मंदिरात १४० कोटींचे दान करणार आहे.

अमरावती: तिरुपतीमधील श्री बालाजी मंदिरात भाविक दररोज लाखो रुपयांचे दान करतात. कुणी रोख रक्कम दान करतो, तर कुणी सोन्या-चांदिचे दागिने दान करतो. आता एका भाविकाने मंदिरात तब्बल १४० कोटी रुपयांचे १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हा भाविक आपल्या व्यवसायातील यशाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी हे दान करणार आहे. या भक्ताचे नाव आणि इतर माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. 

व्यवसायात मिळाले प्रचंड यशमंगलागिरी येथील 'गरिबी निर्मूलन' कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले की, या भाविकाने स्वतःची कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. भगवान वेंकटेश्वर स्वामींच्या कृपेने फक्त कंपनीच स्थापन झाली नाही, तर त्यांना मोठे यशही मिळाले. या भाविकाने आपल्या यशाचे श्रेय देवाला देण्याचे ठरवले. म्हणूनच, आता ते १२१ किलो सोने वेंकटेश्वर स्वामींना अर्पण करत आहेत. 

बालाजीची सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाणारनायडू पुढे म्हणाले की, या भक्ताने आपल्या कंपनीचे ६० टक्के शेअर्स विकून १.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स कमावले आहेत. त्यामुळेच आता आपल्या संपत्तीचा काही भाग देवाला समर्पित करू इच्छितात. भगवान वेंकटेश्वर स्वामींची मूर्ती दररोज सुमारे १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाते. जेव्हा या भक्ताला हे कळले, तेव्हा त्यांनी १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला.

दरवर्षी लाखो भाविक तिरुपतीला भेट देतातभगवान वेंकटेश्वर स्वामींचे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे आहे. हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार वेंकटेश्वर यांना समर्पित आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर त्याच्या भव्यतेसाठी, आध्यात्मिक महत्त्वासाठी आणि देणगीच्या परंपरेसाठी ओळखले जाते. भाविक दरवर्षी या मंदिरात अब्जावधी रुपयांचे सोने, चांदी आणि रोख रक्कम अर्पण करतात.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू