शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

गोरखपूर, महंतांना निवडून देणारा मतदारसंघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:35 IST

खासदारांमध्ये गोरखपूरच्या मठाच्या महंतांची संख्या जास्त आहे.

मुंबई- पूर्व उत्तरप्रदेशातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गोरखपूर मतदारसंघ ओळखला जातो. 1952 पासून आजवरच्या येथील खासदारांमध्ये गोरखपूरच्या मठाच्या महंतांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक काळ या मठातील महंतांना या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. 1952 साली पहिल्या लोकसभेसाठी सिंहासन सिंग येथून निवडून गेले. त्यानंतर 1957, 1962 असे पुन्हा दोन वेळेस ते लोकसभेत याच मतदारसंघातून गेले.1967 साली दिग्विजयनाथ गोरखपूर मठाचे महंत अपक्ष म्हणून लोकसभेत गेले तर 1970 साली महंत अवदेयनाथ अपक्ष म्हणून येथे विजयी झाले. 1971 साली नरसिंग नारायण पांडे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेले. आणीबाणी संपेपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. त्यानंतर 1977 साली जनता लाटेमध्ये भारतीय़ लोकदलाचे हृषिकेश बहादूर विजयी झाले. 1980 साली हृषिकेश बहादूर काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेले. आठव्या लोकसभेसाठी काँग्रेसने गोरखपूरमधून मदन पांडे यांना संघधी दिली आणि ते विजयी झाले. 1989 साली महंत अवदेयनाथ हिंदू महासभेच्या तिकिटावर लोकसभेत गेले. तर 1991 आणि 1996 असे दोनवेळेस ते भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले. त्यानंतर वयाच्या केवळ २६ व्या वर्षी योगी आदित्यनाथ यांना खासदार होण्याची संधी मिळाली आणि सलग पाच वेळा खासदार होत त्यांनी 2014 सालच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी हा गड सोडला नाही. 2017 साली त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद सोडेपर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापुर्वी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या ओळखीबद्दल लोकसभेतील आपल्या भाषणात एक मजेशीर आठवण सांगितली. गोरखपूर हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अत्यंत वाईट समजले जायचे. 26 वर्षाचे आदित्यनाथ जेव्हा पहिल्यांदा निवडून गेले तेव्हा ते एका कामासाठी तत्कालीन रसायन आणि उर्वरक मंत्रालयाचे मंत्री सुरजितसिंग बर्नाला यांना भेटायला गेले. बर्नाला यांना हा तरुण महंत गोरखपूरचा खासदार असेल यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी तीनवेळा तुम्ही खरंच गोरखपूरचे खासदार आहात का असे त्यांना विचारुन खात्री करुन घेतली. तुम्ही अशी खात्री का करुन घेत आहात असे आदित्यनाथांनी विचारल्यावर बर्नाला यांनी एक जुनी आठवण सांगितली. मी एकदा सभेसाठी गोरखपूरला गेलो तेव्हा चारही बाजूंनी दगडफेक, बॉम्बफेक सुरु झाली, तेव्हापासून मी गोरखपूरला कधीच गेलो नाही असं त्यांनी आदित्यनाथांना सांगितलं. ही कायदा आणि सुव्यवस्थेची खराब परिस्थिती आपण सुधारली असा दावा आदित्यनाथ करतात. मात्र आता होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये त्याचे कोणतेही प्रतिबिंब दिसत नाही.

टॅग्स :GorakhpurगोरखपूरElectionनिवडणूक