शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे शेतकरी, कष्टकऱ्यांचा राष्ट्रीय आवाज; जे. पी. नड्डा यांच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 09:34 IST

मुंडेंच्या स्मरणार्थ करण्यात आले डाक पाकिटाचे अनावरण

नवी दिल्ली : लोकनेते गोपीनाथ मुंडे हे कायम जमिनीशी जोडलेले होते. संघर्ष व साहसाचे ते अद्भुत रसायन होते. हा नेता गरीब, दलित, शेतकरी यांचा राष्ट्रीय आवाज होता, बहुजनांचा नेता म्हणून ते विख्यात होते, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावना व्यक्त केल्या.गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्ताने गुरुवारी डाक पाकिटाचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम दुपारी एक वाजता गोपीनाथ गड, परळी येथे झाला. गोपीनाथ मुंडे यांनी जवळपास पाच दशके समाजकारण आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण आणि समाजकारणातल्या योगदानासाठी त्यांच्या स्मरणार्थ डाक पाकीट व तिकीट कॅन्सलेशन तिकिटाचे अनावरण झाले. या कार्यक्रमात जे. पी. नड्डा व्हर्च्युअल पद्धतीने नवी दिल्ली येथून उपस्थित होते.नड्डा म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे लोकनायक होते. त्यामुळे आजच्या तिकीट आवरणातून त्यांचे काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्रातील विविध पदांना दिलेल्या न्याय आणि केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री पदापर्यंतचा प्रवास अद्भुतच राहिला आहे. डाक विभागाने त्यांच्या पाकिटाचे अनावरण करून त्यांच्या स्मृती जागवल्या, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मुंडे खऱ्या अर्थाने नव्या विचारांचे धनी होते. त्यांनी महिलांना विमा संरक्षण दिले, ऊस कामगारांसाठी महामंडळे स्थापली, झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली. त्यांचे काम जर खरेच लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर नेत्यांना, कार्यकर्त्यांना तळागाळात जाऊन काम करायला हवे. यावेळी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे व रावसाहेब दानवे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमात सहभागी झाले होते. परळीतील गोपीनाथ गडावरून माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, राज्यसभेतील खासदार भागवत कराड हे सहभागी झाले होते.

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडे