शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुगलचा भारतासाठी खजिना खुला; पंतप्रधान माेदींशी चर्चेनंतर सुंदर पिचाई यांची घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 05:14 IST

भारत-अमेरिकादरम्यान समुद्राखाली नवीन केबल मार्ग उभारणार; २ कोटी सरकारी कर्मचारी, १.१ कोटी विद्यार्थ्यांना एआयचे प्रशिक्षण

नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘गुगल’ने भारतासाठी आपल्या खजिन्याचे दार उघडले आहे. ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारत-अमेरिकादरम्यान एआय कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी समुद्राखालील नवा केबल मार्ग उभारण्याची घोषणा केली आहे. याचवेळी त्यांनी २ कोटी सरकारी कर्मचारी आणि १.१ कोटी विद्यार्थ्यांना एआयचे खास प्रशिक्षण देण्याची घोषणा केली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पिचाई यांनी ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये ही माहिती दिली. भारताच्या प्रगतीत तंत्रज्ञान कशी क्रांती घडवू शकते, याबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

भारतामध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, लवकरच एखादी जागतिक पातळीवरील मोठी ‘आयटी’ किंवा ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) कंपनी इथल्या मातीतून उभी राहील. भारतीय तरुणांमध्ये असलेली जिद्द आणि इथली बदललेली बाजारपेठ पाहता, आता प्रगतीच्या मार्गावर कोणताही अडथळा उरलेला नाही.

भारत जागतिक दर्जाच्या एआय कंपन्या उभ्या करू शकतो. मला यात कोणतीही अडचण दिसत नाही. भारत यासाठी अत्यंत चांगल्या स्थितीत आहे, असेही सुंदर पिचाई म्हणाले.

१. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (विझाग) येथे १५ अब्ज डॉलर्स (सुमारे १ लाख ३५ हजार कोटी) खर्चून एक भव्य ‘एआय हब’ उभारणार.

२. ‘कर्मयोगी भारत’ उपक्रमांतर्गत देशातील १८ भाषांमधील ८०० जिल्ह्यांतील सुमारे २ कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार.

३. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून १.१ कोटी विद्यार्थ्यांना आणि १० हजार शाळांना ‘जनरेटिव्ह एआय’ची मदत.

४. एआयच्या मदतीने रोगांचे लवकर निदान करणे, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवून शेतकऱ्यांना मदत करणे आणि स्थानिक भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देणे, यावर गुगलचा विशेष भर.

५. एआय आता १० पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना तंत्रज्ञान वापरणे सोपे.

६. संशोधकांसाठी ‘एआय फॉर सायन्स इम्पॅक्ट चॅलेंज’ जाहीर. यात २७२ कोटी रुपयांची मदत संशोधकांना करणार.

मोदींच्या हस्ते आज उद्घाटन

‘इंडिया एआई इम्पॅक्ट शिखर संमेलन २०२६’चे दिमाखदार उद्घाटन गुरुवारी (१९ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राजधानी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे हा सोहळा रंगणार आहे. यासाठी आलेल्या जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी स्वागत केले.

चिनी ‘रोबो डॉग’मुळे  विद्यापीठ पडले ताेंडघशी

एआय समिटमध्ये आपल्या संशोधनाचा डंका वाजवू पाहणाऱ्या गलगोटिया विद्यापीठाची मोठी फजिती झाली. चीनमध्ये तयार झालेल्या ‘रोबोटिक डॉग’ला स्वतःचे संशोधन सांगणाऱ्या गलगोटिया विद्यापीठाने झालेल्या प्रखर टीकेनंतर जाहीर माफी मागितली आहे.  या प्रकारानंतर सरकारने कडक पावले उचलत विद्यापीठाचा स्टॉल तातडीने रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Google Opens India's Treasure: Pichai Announces After Modi Talks

Web Summary : Google will invest heavily in India, boosting AI connectivity and training millions. A new undersea cable and AI hub in Visakhapatnam are planned, alongside AI training for government employees and students, strengthening India's AI capabilities.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSundar Pichaiसुंदर पिचई