शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आणखी सात भाषांत अनुवाद करणार गुगल ट्रान्सलेट अ‍ॅप, आॅफलाइनही चालणार, मराठी, तामिळ, बंगाली, उर्दूचाही समावेश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:38 IST

सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अ‍ॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये आता मराठी, बंगाली व उर्दूसह सात आणखी भाषा असतील.

नवी दिल्ली : सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अ‍ॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये आता मराठी, बंगाली व उर्दूसह सात आणखी भाषा असतील.ज्या भारतीय भाषांसाठी गुगल ट्रान्सलेट अ‍ॅपची सेवा सुरू केली आहे, त्यात बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ, तेलुगु व उर्दू या भाषांचा समावेश आहे. अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस स्मार्टफोनमध्ये या अ‍ॅपचा उपयोग करता येईल. ही सुविधा आॅफलाइनही असणार आहे. म्हणजेच इंटरनेट नसतानाही या फिचरचा उपयोग केला जाऊ शकतो.मात्र, हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अधिकाधिक भारतीय नागरिकांना त्यांच्या भाषेत सूचना आणि माहिती मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. गुगलने आपल्या कॉन्व्हर्सेशन मोडचा (संभाषण) विस्तार केला असून, यात बंगाली आणि तामिळ भाषेचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीची सर्व फिचर हिंदी भाषेत आधीपासूनच आहेत. आता त्यात अन्य भाषांची भर पडली आहे.छापील मजकुराचाही होणार अनुवादया अ‍ॅपद्वारे एखाद्या भाषेतील छापील मजकुराचाही अनुवाद करता येईल. यासाठी कॅमेरा त्या मजकुराच्या प्रतिमेवर ठेवावा लागेल. त्याचाअनुवाद फोनच्या स्क्रीनवर पाहता येईल. उदाहरणार्थ, रस्त्यांवरील इंग्रजीतील बोर्डाचा मजकूर या अ‍ॅपच्या माध्यमातून हिंदी व अन्य भाषेत दिसू लागेल.गुगलची व्याप्तीगुगल ही अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कॅलिफोर्नियात मुख्यालय असून इंटरनेट सर्च, कॉम्युटर सॉफ्टवेअरमध्ये ती कार्यरत आहे. ४ सप्टेंबर १९९८ रोजी कंपनीची स्थापना झाली. भारतीय वंशाचे सुंदर पिचई कंपनीचे सध्याचे सीईओ आणि सह संस्थापक आहेत. या कंपनीचे ५७,१०० कर्मचारी आहेत.

टॅग्स :Indiaभारत