शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सरकारच्या इशाऱ्यानंतर Google ची कारवाई, Play Store वरुन 2200 Loan Apps हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 20:19 IST

केंद्र सरकार फसवणूक करणाऱ्या लोन ॲप्सविरोधात सातत्याने कारवाई करत आहे.

Govt on Loan APP :केंद्र सरकार फसवणूक करणाऱ्या लोन ॲप्सविरोधात सातत्याने कारवाई करत आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, सरकार या प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि इतर नियामकांसोबत काम करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) माहितीनुसार, एप्रिल 2021 ते जुलै 2022 दरम्यान, Google ने सुमारे 3,500 ते 4,000 लोन ॲप्सची तपासणी केली आणि 2,500 हून अधिक ॲप्स Play Store वरून काढून टाकले. .

2,200 ॲप्स काढलेसप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत 2,200 हून अधिक लोन ॲप्स Google Play Store वरुन काढून टाकण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, 'गुगलने प्ले स्टोअरवरील लोन ॲप्सबाबत आपले नियम अधिक कठोर केले आहेत. आता केवळ अशा कंपन्यांचे कर्ज ॲप्स प्ले स्टोअरवर असू शकतात, जे सरकारी नियमांचे पालन करतात किंवा कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त कंपनीच्या सहकार्याने काम करतात. 

त्यांनी सांगितले की, 'रिझर्व्ह बँकेने डिजिटल कर्जाबाबत नवीन नियम जारी केले आहेत. डिजिटल कर्ज देण्याची प्रक्रिया स्वच्छ आणि सुरक्षित करणे हा त्यांचा उद्देश आहे, जेणेकरून ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, गृह मंत्रालयाचे (MHA) इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) डिजिटल लोन ॲप्सवर सतत नजर ठेवत आहे. नागरिकांना बेकायदेशीर कर्ज ॲप्ससह सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यात मदत करण्यासाठी, गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (www.cybercrime.gov.in) आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन सुरू केली आहे. '1930' हा क्रमांक सुरू झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, 'सायबर गुन्ह्यांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. यामध्ये सोशल मीडिया खात्यांद्वारे सायबर सुरक्षा टिप्स देणे, किशोरवयीन आणि विद्यार्थ्यांसाठी हँडबुक प्रकाशित करणे, सरकारी अधिकाऱ्यांसाठी माहिती प्रकाशित करणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने सायबर सुरक्षा आणि जागरूकता सप्ताह आयोजित करणे इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि इतर बँकांनीही अनेक प्रकारे काम केले आहे. यामध्ये फोन मेसेज पाठवणे, रेडिओवर जाहिराती देणे आणि ‘सायबर गुन्हे’ रोखण्याच्या मार्गांची माहिती देणे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारtechnologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइमBhagwat Karadडॉ. भागवत