शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:12 IST

व्यापाराच्या आड मनी लाँड्रिंग; चौकशी सुरू

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशाचा वित्तीय गुप्तचर विभाग अनेक निर्यातदार कंपन्यांची व्यापार-आधारित मनी लाँड्रिंगच्या संशयावरून चौकशी करत आहे. या माध्यमातून कथितरीत्या संयुक्त अरब अमिरातच्या माध्यमातून पाकिस्तानसाठी आणि पाकिस्तानातून निधी हस्तांतरण होत असल्याचे समोर आले आहे.

अधिकृत बंदी असूनही अनौपचारिक व्यापार मार्ग कसे भरभराटीला येत आहेत, हे यावरून स्पष्ट होते. व्यापारात स्वस्त दागिने, मौल्यवान स्टोन, सुकामेवा, सौंदर्य उत्पादने आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश आहे. तपासात याबाबतच्या पावत्या आढळून आल्या आहेत. अगदी १०० रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू ८००० ते १९००० रुपयांना विक्री करण्यात आल्या, तर १५० रुपये किमतीचे दागिने ३० हजार रुपयांना विक्री केलेत. काही प्रकरणांमध्ये यूएईतील मध्यस्थांना दिले जाणारे कमिशन वस्तूंच्या किमतीपेक्षा अधिक होते.

२०१९ मध्येही भारत आणि पाकमधील व्यापार थांबला असला, तरी तिसऱ्या देशांमधून यूएईमधून होणारा अप्रत्यक्ष व्यापार तेव्हाही अप्रत्यक्षपणे सुरू होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बंदी अनेकदा औपचारिक मार्गांमध्ये अडथळा आणते; परंतु भूमिगत नेटवर्क थांबवण्यासाठी फारसे काही करत नाही. 

गेल्या १४ महिन्यांतील व्यवहारांची तपासणी

एका अधिकाऱ्याने सांगितले, एफआययू गेल्या १४ महिन्यांतील व्यवहारांची तपासणी करत आहे. दहशतवादाशी काही संबंध आहे काय याचा तपास करण्यासाठी अन्य तपास एजन्सींना ही माहिती दिली जात आहे. अशी उदाहरणे सीमापार आर्थिक गुन्ह्यांमध्ये व्यापार-आधारित मनी लाँड्रिंगची वाढती भूमिका अधोरेखित करतात.

उत्तर वझिरिस्तानात १४ दहशतवाद्यांचा खात्मा

अफगाणिस्तानला लागून असलेल्या उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यातील दाताखेल परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत १४ दहशतवादी ठार झाले अशी माहिती पाकिस्तानी लष्कराच्या प्रसारमाध्यम विभागाने बुधवारी दिली. २ व ३ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. 

बिलावल भुत्तोचा तोरा उतरला, म्हणे, एकत्रित दहशतवादाविरुद्ध लढू

भारत व पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांमध्ये माहितीची देवाणघेवाण झाल्यास, सहकार्य वाढल्यास दक्षिण आशियातील दहशतवादात लक्षणीय घट होऊ शकते असे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो-झरदारी यांनी म्हटले आहे. पूर्वी भारताविराेधात बाेलणाऱ्या  भुत्तोनी आता नरमाईचा सूर लावल्याचे दिसते.

भारताबरोबर नुकत्याच झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानने आपल्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने बिलावल यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहे.  संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात  घेतलेल्या पत्रकार परिषदेत भुत्तो यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाली. हे केवळ पहिले पाऊल असून आणखी अनेक गोष्टी दोन्ही देशांना साध्य करायच्या आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान