शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडून युती तोडताच या पक्षाला पडलं मोठं 'खिंडार'; बंडाचा आवाज 2024 मध्ये घुमणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 12:30 IST

खरे तर, राज्यातील भाजपचे नेतृत्व आपल्या नेत्यांना बदनाम करत आहे, असे म्हणत या पक्षाने भाजपसोबतची युती तोडली होती.

आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी दक्षिण भारतातील जागांवर लक्ष केंद्रित करत असलेल्या भाजपासाठी एक शुभ संकेत आहे. सप्टेंबर महिन्यात एनडीएसोबतचे संबंध तोडणाऱ्या आणि तामिळनाडूतील एक मोठा पक्ष असलेल्या AIADMK मध्ये बंड झाले आहे. खरे तर, राज्यातील भाजपचे नेतृत्व आपल्या नेत्यांना बदनाम करत आहे, असे म्हणत या पक्षाने भाजपसोबतची युती तोडली होती.

आता एआयएडीएमकेचे महासचिव पलानीस्वामी आणि पक्षातून हकालपट्टी केलेले नेते ओ. पन्नीरसेल्वम यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर स्वतःला पक्ष समन्वयक म्हणणारे माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी पुढील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद वाढविण्याचे संकेत दिले आहेत. 

पन्नीरसेल्वम म्हणाले, आम्ही AIADMK चे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी यांचे क्रौर्य रोखण्यासाठी हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ते म्हणाले, पलानीस्वामी यांनी AIADMK च्या नियमांचे उल्लंघन केले आहे आणि माजी मुख्यमंत्री तथा पक्षाच्या नेत्या एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिलेल्या अधिकारांचे पालन केले नाही.

पन्नीरसेल्वम पुढे म्हणाले, कारागृहात कोण जाणार हे काळच ठरवेल. पन्नीरसेल्वम यांचे म्हणणे आहे की, दिवंगत माजजी मुख्यमंत्री जयललिता यांना पक्षाचे स्थायी सरचिटणीस करण्यात आले होते. तो नियम तोडून कुणालाही ती पोस्ट हडपण्याचा अधिकार नाही. खरे तर, हा पक्षांतर्गत वाद 19 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठीही येणार आहे.

मोदी सरकारचं मुक्त कौतुक -तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत भारताला एक महान आणि आघाडीचा देश बनवले आहे. असेच सुशासन चालू राहावे यासाठी आम्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकेल आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा आयडियावर काम करत आहोत. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक