शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर... येतोय आठवा वेतन आयोग, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयोग गठित करण्यास दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:04 IST

माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली.

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांसाठी ८व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली. संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारक यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ होऊन त्यांच्या वेतन व भत्त्यांत घसघशीत वाढ होईल.

माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ८व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि २ सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल. उल्लेखनीय असे की, २०१४ मध्ये ७व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि १ जानेवारी २०१६ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती. 

किती आयोग, खर्चाचा भार किती?सातव्या आयोगामुळे २०१६-१७ मध्ये केंद्र सरकारच्या खर्चात १ लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती.पहिला वेतन आयोग १९४७ मध्ये स्थापन झाला. तेव्हापासून सरकारने ७ आयोग गठीत केले आहेत.

दिल्लीच्या कर्मचाऱ्यांनाही सोबतच लाभ  सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, ८व्या वेतन आयोगाचा दिल्लीतील ४ लाख कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल. यात संरक्षण क्षेत्रासह दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारणत: केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसारच वाढ होते, हे येथे महत्त्वाचे.

अर्थव्यवस्थेला काय होणार फायदा?नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनविषयक गुणवत्तेत सुधारणा होईल. तसेच वस्तू उपभोग आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल. त्याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला होईल.

५०लाख केंद्रीय कर्मचारी

६५लाख पेन्शनर्स

टॅग्स :Employeeकर्मचारी