शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! आता मोबाईल क्रमांक आधारशी लिंक न केल्यास होणार नाही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 17:04 IST

नवी दिल्ली- मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाहीये. त्यामुळे मोबाईल क्रमांक आधारशी न जोडल्यास बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभागानं दिलं आहे.

नवी दिल्ली- मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाहीये. त्यामुळे मोबाईल क्रमांक आधारशी न जोडल्यास बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभागानं दिलं आहे. आधारशी लिंक न केल्याच्या कारणास्तव मोबाईल कंपन्यांना कोणाचेही मोबाईल नंबर बंद करता येणार नाही, अशी माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे.मोबाईल नंबर आधारला जोडण्याच्या केंद्राच्या सक्तीविरोधात अनेक ग्राहकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असून, हा निर्णय न्यायालयात आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यामुळे मोबाईल नंबर आधारशी लिंक न केल्याच्या  कारणास्तव ग्राहकांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असं दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदराजन म्हणाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे.मोबाइल कंपन्यांना मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. तसेच परदेशी असलेल्या लोकांशीही मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यासंदर्भात आम्ही काम करत आहोत. 2018पासून आधार क्रमांकाच्या माध्यमातून ग्राहकांची सत्यता पडताळण्याचा मोबाईल कंपन्यांचा मानस आहे. 1 डिसेंबर 2017पर्यंत मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करायचा की नाही, याचा निर्णय होणार आहे, असंही दूरसंचार विभागानं सांगितलं आहे. परंतु अनेक मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना आधारला मोबाईल नंबर लिंक करा, अन्यथा नंबर बंद करू, अशा प्रकारचे मॅसेज येतायत. आधारला लिंक करण्याच्या नावाखाली मोबाईल कंपन्या ग्राहकांना घाबरवत असल्याचंही समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दूरसंचार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व मोबाइल कंपन्यांना मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश दिला होता. दूरसंचार विभागाने 23 मार्च रोजी मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने बँक खात्यांप्रमाणे मोबाइल क्रमांकही आधार कार्डशी जोडणं अनिवार्य केलं होतं. लिंक न केल्यास एका ठराविक तारखेनंतर मोबाइल क्रमांक बंद केला जाईल, अशी भीतीही ग्राहकांना दाखवली जात होती. दुसरीकडे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना वेगवेगळ्या सेवांसाठी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं आहे.'काय हवं ते करा, पण आधारला मोबाइलसोबत लिंक करणार नाही' - ममता बॅनर्जीपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपण आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'मी आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नाही. जर त्यांना हवं असेल तर त्यांनी माझा मोबाइल क्रमांक बंद करुन टाकावा. पण मी आधार लिंक करणार नाही'. याचवेळी ममता बॅनर्जी यांनी लोकांनाही आपल्याला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी बोलल्या आहेत. 

टॅग्स :MobileमोबाइलAdhar Cardआधार कार्ड