शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 19:10 IST

पुढील 2019 हे वर्ष खूप काही घेऊन येणार आहे.

मुंबई : पुढील 2019 हे वर्ष खूप काही घेऊन येणार आहे. तीन वर्षांपूर्वी केलेल्या नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले असून आधुनिक प्रणालीद्वारे सेवा पुरविण्यासाठी पुढील वर्षात सार्वजनिक बँका तब्बल 1 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. यामध्ये स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा, सिंडिकेट बँक या बँकांचा समावेश आहे.

सरकारी बँकांना एचडीएफसी, आयसीआयसीआय सारख्या खासगी बँकांनी आव्हान उभे केले आहे. सरकारी बँकांना अत्याधुनिक प्रणाली वापरण्यास आणि त्याद्वारे सेवा देण्यास कठीण जात आहे. या तुलनेत खासगी बँकांमध्ये तरुण कर्मचारी जास्त असल्याने त्यांना अत्याधुनिक सेवा देण्यास सोपे जात आहे. यामुळे नवीन वर्षात सरकारी बँका न्यू एज बँकिंग आणि व्यवसाय वृद्धीसाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. 

मागील दोन वर्षांत सरकारी बँकांनी 95 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. मात्र, आता होणारी भरती ही दुप्पट आहे. बँकांना मनुष्यबळ पुरविणारी संस्था टीमलीजच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बँकांनी गेल्या दोन वर्षांत क्लर्क, मॅनेजमेंट ट्रेनी आणि प्रोबेशनरी अधिकारी मोठ्या प्रमाणावर भरती केले आहेत. आता या बँका मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ लोकांची भरती करणार आहेत. यामध्ये मालमत्ता व्यवस्थापन, विश्लेषक, धोरण, डिजिटल बँकिंग आणि ग्राहक सेवा या क्षेत्रात भरती होणार आहे. 

सरकारी बँकांचा ग्राहक मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना चांगली सेवा देण्यास अपयश येत होते. यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर खासगी बँकांकडे वळत आहे. यामध्ये बदल करण्यासाठी या सरकारी बँका नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 20 टक्केच क्लर्क काम करतात. या बँकांमध्ये अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर एसबीआयमध्ये हेच प्रमाण 45 टक्के आहे. तसेच या बँकांमध्ये कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 46.5 वर्षे आहे. यामुळे या बँकांना तरुण आणि हुशार मनुष्यबळाची नितांत गरज भासू लागली असल्याचे टीमलीजचे अधिकारी चक्रवर्ती यांनी सांगितले. 

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाBank of Indiaबँक ऑफ इंडियाBanking Sectorबँकिंग क्षेत्र