शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! तिसऱ्या लाटेची शक्यता होऊ लागली धूसर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 07:47 IST

Corona Virus in Maharashtra केरळातही घटू लागले कोरोनाचे नवे रुग्ण. केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने मात्र यावर टिप्पणी करणे टाळले आहे. पण, काही सदस्यांनी सांगितले की, तिसरी लाट येऊ शकत नाही. जरी आली तरी ती मोठ्या प्रमाणात पसरणार नाही.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारे संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कंबर कसत असले तरी तज्ज्ञांच्या मते देशात तिसरी लाट येण्याची शक्यता कमी होते आहे. जरी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेप्रमाणे विनाशकारी आणि प्राणघातक असणार नाही.

केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने मात्र यावर टिप्पणी करणे टाळले आहे. पण, काही सदस्यांनी सांगितले की, तिसरी लाट येऊ शकत नाही. जरी आली तरी ती मोठ्या प्रमाणात पसरणार नाही.टास्क फोर्सच्या ज्येष्ठ सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नवे रुग्ण कमी होत आहेत. ऑगस्टच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र आणि केरळातही रुग्ण वेगाने कमी होऊ शकतात. तुरळक राज्य वगळता बहुतांश राज्यात आज मृत्यू होत नाहीत. ऑगस्ट अखेरपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारपर्यंत कमी होऊ शकते. ऑगस्ट अखेरपर्यंत लसीकरण ६५ कोटींपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे मृत्यू व हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून बचाव होऊ शकतो. इंडियन सार्स- कोविड २ जीनोमिक्स कन्सोर्टियमचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा ‘लोकमत’कडे म्हणाले की, आणखी तीन आठवडे थांबा म्हणजे, तिसऱ्या लाटेबाबत मी वास्तविक टिप्पणी करू शकेल.

आणखी एक लाट येणार की, नाही हे जाणून घेण्याची निश्चित अशी पद्धत नाही. मात्र, दुसऱ्या लाटेइतकी ती त्रासदायक नसेल.डॉ. सौम्या, मुख्य वैज्ञानिक, जागतिक आरोग्य संंघटना

आम्हाला तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची बहुधा गरज पडणार नाही. मात्र, आम्हाला आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही. कारण, समस्या संपलेली नाही.- डॉ. जेकब जॉन, वेल्लोर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस