शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गुड न्यूज! देशाला मार्चपर्यंत कोरोना लस मिळणार; सिरम इन्स्टिट्यूटचा अंदाज

By हेमंत बावकर | Published: October 17, 2020 10:08 AM

Covid-19 vaccine in India: सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या कार्यकारी संचालकांनी याची माहिती दिली आहे.

जर सर्वकाही योग्य दिशेने राहिले तर भारताला मार्च 2021 पर्यंत कोरोनावरील लस (Corona vaccine) मिळू शकणार आहे. जगातील सर्वाच मोठी लस निर्माता कंपनी सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीकडून देशभरात ऑक्‍सफर्ड-अॅस्ट्राझिनेका (Oxford -AstraZeneca Coronavirus vaccine) कंपननीच्या कोरोना लसीची ट्रायल घेतली जात आहे. 

सिरम इंन्स्टिट्यूट (SII) चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली आहे. भारताला मार्च 2021 पर्यंत कोरोना लस मिळू शकते. प्रशासनाने जर लवकर मंजुरी दिली तर ते शक्य आहे. अनेक कंपन्या या लसीवर काम करत आहेत. भारतात हे संशोधन वेगाने सुरु आहे. देशात दोन कोरोना लसींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. तर एका लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. तसेच अन्य कंपन्याही लसीवर संशोधन करत आहेत, असे ते म्हणाले. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्यानुसार पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोना लस तयार व्हायला हवी. कोणत्याही लसीच्या चाचणीमध्ये उतार चढाव येतात. जानेवारी 2021 पर्यंत आम्ही अंतिम चाचण्यांचे अहवाल पाहू. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीपर्यंच SARS-CoV-2 विरोधात लस तयार व्हायला हवी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

डॉ. जाधव यांनी इंडिया व्हॅक्सिन अव्हेलॅबिलीटी ई समीटला संबोधित करताना सांगितले की, आम्ही दर वर्षी 70 ते 80 कोटी डोस बनवू शकतो. देशाची 55 टक्के लोकसंख्या ही 50 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र, उपलब्धता आणि रिस्कच्या आधारावर आधी ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जावी. यानंतर इतरांना. आम्ही डिसेंबर 2020 पर्यंत 6 ते 7 कोटी डोस तयार करत आहोत. मात्र, लायसन मिळाल्यानंतरच ही लस बाजारात येईल. यानंतर आम्ही सरकारच्या संमतीने आणखी डोस तयार करू.

वयोगटानुसार कोरोना लसींना मंजुरी दरम्यान कोरोना लसीच्या वितरणाबाबत सरकारने तयारी सुरु केली असून एकापेक्षा जास्त कोरोना लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतात ज्या लसींची चाचणी सुरु आहे, त्या डबल किंवा ट्रिपल डोसच्या लसी आहेत. संशोधकांनुसार एका डोसच्या लसीपेक्षा दोन किंवा तीन डोसच्या लसी जास्त परिणामकारक आहेत. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, वयोगटानुसार परिणामकार असलेल्या वेगवेगळ्या लसींना मंजुरी दिली जाऊ शकते. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या