शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 11:22 IST

...यासंदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे.

जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख आणखी पुढे ढकलली आहे. यावेळी सरकारने तीन महिन्यांनी मुदत वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून होती. ती आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे.

आधार आणि रेशनकार्ड लिंक करणे का आहे आवश्यक? -सरकारने 'वन नेशन-वन रेशन कार्ड'ची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवरही लाभ घेत आहेत. यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते. असे, सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.

यापूर्वीही अनेकवेळा देण्यात आलीय मुदतवाढ -आधार आणि रेशन कार्ड लिंक करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महत्वाचे म्हणजे, रेशन कार्ड आधारला लिंक करण्याच्या अंतिम तारखेला सरकारने यापूर्वीही अनेक वेळा मुदत वाड दिली आहे. आता पुन्हा एकदा हिला मुदतवाढ देत 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर, गरजूंपर्यंत त्यांच्या वाट्याचे खाद्यान्न पोहोचणे सोपे होईल. ते सुरळितपणे पोहोचू शकेल. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकारAdhar Cardआधार कार्ड