शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! रेल्वे तिकिटांवर पुन्हा मिळू शकते सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:03 IST

Indian Railways : एका अहवालानुसार, सध्या देशात अशी दावा न केलेली रक्कम सव्वा लाख कोटींहून अधिक आहे आणि आत्तापर्यंत या निधीतून ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित अनेक योजना कार्यान्वित केल्या जात आहेत.

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) रेल्वे तिकिटांमध्ये (Train Ticket) मिळणाऱ्या सवलतींबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने यासंदर्भात रेल्वेकडून माहिती मागवली आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका कमी झाल्याने आणि देशातील इतर सर्व घडामोडी आता सामान्य झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी भाड्यात सवलत देण्यासाठी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यामुळे वाढता दबाव कमी करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय सक्रिय भूमिका बजावत आहे. सरकार या प्रयत्नात आहे की, रेल्वेवर आर्थिक ताण पडू नये आणि सवलतीही देता येतील.

एका अहवालानुसार, सध्या देशात अशी दावा न केलेली रक्कम सव्वा लाख कोटींहून अधिक आहे आणि आत्तापर्यंत या निधीतून ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित अनेक योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. सध्या ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित संघटनांची मागणी लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने  यासंदर्भात रेल्वेकडून आवश्यक माहिती मागवली असून, त्यानंतर केंद्र सरकार पुढील धोरणावर काम करेल.

दोन वर्षांपासून ही सुविधा बंदकोरोना महामारीच्या काळात खराब आर्थिक स्थिती लक्षात घेता, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसह तीन श्रेणी वगळता इतर सर्वांसाठी भाड्यात सवलत बंद केली होती. मात्र, ही सुविधा कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही. मात्र ज्याप्रकारे ज्येष्ठ नागरिकांकडून ही सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहे, ते पाहता त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 14 कोटी आहे.

रेल्वेमंत्री काय म्हणाले होते?दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत सांगितले होते की, सुमारे सात कोटी ज्येष्ठ नागरिक जवळपास दोन वर्षांपासून कोणतीही सूट न देता रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात कोणतीही सूट न देता प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेSenior Citizenज्येष्ठ नागरिक