शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वंदे भारतसह 'एसी चेअर कार' चे भाडे २५ टक्के घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 05:55 IST

अल्प प्रतिसाद मिळालेल्या गाड्यांमध्ये होणार लागू 

नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. रेल्वेने 'वंदे भारत 'सह सर्व गाड्यांतील एसी चेअर कार (सीसी) व एक्झिक्युटिव्ह क्लासेसच्या (ईसी) भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे

गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांतील वरील वर्गांना ५० टक्क्यांहून कमी प्रवासी मिळाले, त्या गाड्यांना ही सवलत त्वरित लागू केली जाणार असून, यात अनुभूती आणि विस्टाडोम डबे असलेल्या गाड्यांचाही समावेश असेल, असे रेल्वे मंडळाच्या एका आदेशात म्हटले आहे. सीसी, ईसी वर्गाचे भाडे ठरविण्यात येणार आहे. रेल्वेतील सोयीसुविधांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.

कोणत्या गाड्यांना लागू असेल सूट ?

अनुभूती आणि विस्टाडोम डब्यांसह वातानुकूलित आसन सुविधा असलेल्या सर्व रेल्वेच्या एसी चेअर कार व एक्झिक्युटिव्ह क्लासेससाठी ही योजना असेल

मूळ भाड्यावर कमाल २५ टक्क्यांची सूट दिली जाईल. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, वस्तू व सेवा कर यासारखे इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जाईल.

सीसी व ईसीतील किती जागा आरक्षित झाल्या आहेत या आधारावर एखाद्या किंवा सर्व वर्गात तसेच संपूर्ण प्रवास किंवा दरम्यानच्या एखाद्या टप्प्यासाठी सवलत दिली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे