शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मधुमेहींसाठी खुशखबर...! अमूलने आणले सांडनीचे दूध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 13:55 IST

फेडरेशनचे महाप्रबंधक आर एस सोढी यांन मंगलवारी सांगितले की सांडनीचे दूध बुधवारपासून बाटलीमध्ये विकले जाणार आहे.

आणंद (गुजरात) : देशातील प्रसिद्ध दुग्ध पदार्थ उत्पादक संघ अमूल आजपासून सांडनी म्हणजेच उंटीनीचे दूध विक्री करणार आहे. याची सुरुवात गुजरातच्या अहमदाबाद, कच्छ आणि गांधीधामपासून करण्यात येणार आहे. अमूलची मालकी गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशनकडे आहे. या महासंघासोबत राज्यातील 18 डेअरी जोडलेल्या आहेत. 

फेडरेशनचे महाप्रबंधक आर एस सोढी यांन मंगलवारी सांगितले की सांडनीचे दूध बुधवारपासून बाटलीमध्ये विकले जाणार आहे. या दुधाचे अनेक फायदे आहेत. मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे. शिवाय यामध्ये अनेक तऱ्हेचे पोषक तत्वे आणि औषधीय गुणधर्म आहेत. तसेच हे दूध पचण्यासही हलके आहे. गाय आणि म्हशीच्या दुधापासून ज्यांना अ‍ॅलर्जी आहे, ते लोक हे दूध पिऊ शकणार आहेत. सांडनीच्या दुधाची किंमत 50 रुपये प्रती लिटर असणार आहे. कच्छच्या सरहद डेअरीने सुरुवातीला चार ते पाच हजार लीटर सांडनीचे दूध गोळा करण्यास सुरुवात केली होती. हे प्रमाण वाढल्यानंतर अन्य ठिकाणीही दूध विक्री सुरु करण्यात येणार आहे.

चॉकलेट आधीच लाँच केले होते...सांडनीच्या दुधापासून बनविलेले चॉकलेट गेल्यावर्षीच बाजारात आणण्यात आले होते. या चॉकलेटला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. अमुलचे सांडनीचे दूध फ्रिजमध्ये तीन दिवस टिकू शकते. 

टॅग्स :milkदूधMilkha Singhमिल्खा सिंगdiabetesमधुमेह