शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी! भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, रिकव्हरी रेट ९५.१२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 17:22 IST

CoronaVirus News : सध्या देशात कोरोनाचे फक्त ३,३९,८२० अक्टिव्ह रुग्ण आहेत.

ठळक मुद्देभारतातही कोरोनाचा संसर्ग 99 लाखाहून अधिक लोकांना झाला आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ९९ लाखांच्या पुढे गेली आहे. यातच आपल्या कोविड -१९ विरुद्धच्या लढाईतील हा महत्त्वाचा क्षण आहे. भारतात कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर वाढत आहे. सध्या देशात बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९५.१२ टक्के आहे. जो जगात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. 

कोरोनाची अॅक्टिव्ह प्रकरणेही कमी झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे फक्त ३,३९,८२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे परिणाम आमच्यासमोर आहेत, असे आरोग्यमंत्री म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोनाचे ३,३९,८२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ९४,२२,६३६ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत १,४३,७०९ कोरोना संक्रमित लोकांचा मृत्यू झाला.

जगभरात कोरोनामुळे मोठे नुकसान झाला आहे. अमेरिकेसारख्या देशालाही आपल्या लोकांना कोरोनापासून वाचवता आले नाही. जवळजवळ सर्व देशांमधील लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचा संसर्ग 99 लाखाहून अधिक लोकांना झाला आहे. पण, आता भारतात कोरोनावर मात करण्यात येत आहे.

दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळू शकते, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी म्हटले आहे. अदार पूनावाला यांची कंपनी यूकेच्या ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या सहकार्याने कोरोना लसीवर काम करत आहे. ही कंपनी कोव्हिशिल्ड लस तयार आहेत. एवढेच नव्हे तर इंडिया बायोटेक आणि फायझर इंडियादेखील देशात कोरोनावरील लस बनवण्याच्या शर्यतीत सहभागी आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत