आनंदाची बातमी... 39 विविध औषधांच्या किमती हाेणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:00 AM2021-09-06T07:00:59+5:302021-09-06T07:01:29+5:30

केंद्राचा निर्णय : कोरोना तसेच मधुमेहावरील औषधे

Good news ... 39 Prices of various medicines will go down | आनंदाची बातमी... 39 विविध औषधांच्या किमती हाेणार कमी

आनंदाची बातमी... 39 विविध औषधांच्या किमती हाेणार कमी

Next
ठळक मुद्देकेंद्रीय आराेग्यमंत्री यांनी अत्यावश्यक औषधांची नवी यादी ‘आयसीएमआर’तर्फे आयाेजित एका कार्यक्रमात जाहीर केली.

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही गंभीर आजारांवरील औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. कॅन्सर विरोधी औषधे, मधुमेह, टीबी, अँटीव्हायरल, अँटीबॅक्टीरियल, अँटीरेट्रोव्हायरल आणि कोविड उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांसह सुमारे ३९ औषधांच्या किमती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना माेठा दिलासा मिळाला आहे. 

केंद्रीय आराेग्यमंत्री यांनी अत्यावश्यक औषधांची नवी यादी ‘आयसीएमआर’तर्फे आयाेजित एका कार्यक्रमात जाहीर केली. औषध विषयक राष्ट्रीय स्थायी समिती आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल ॲनालिसिस यांनी या यादीतील औषधांची निवड केली. त्यानंतर नीती आयाेगाने त्यास अंतिम मंजुरी दिली. ‘वर्ल्ड वेल बिईंग ऑर्गनायझेशन’ने अत्यावश्यक औषधांच्या यादीत बदल केले हाेते. 

n सध्या काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका आहे. अशा वेळी काेराेना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे ‘आयव्हरमेक्टीन’ या औषधाची किंमत कमी करण्यात आली आहे. तसेच टेनीलिग्लीप्टीन हे मधुमेह प्रतिराेधक औषध तसेच बेडाक्वीलाईन आणि डेलामॅनिड ही क्षयराेगावरील औषधे आणि राेटाव्हायरस लसीचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Good news ... 39 Prices of various medicines will go down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.