शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

‘सौभाग्य’ची वीज फुकट नाही! गरिबांना फक्त वीज जोडणी विनामूल्य, सरकारचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 2:10 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी उद्धाटन केलेल्या ‘सौभाग्य’ योजनेत कोणालाही फुकट वीज पुरविली जाणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने बुधवारी केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी उद्धाटन केलेल्या ‘सौभाग्य’ योजनेत कोणालाही फुकट वीज पुरविली जाणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने बुधवारी केले.या योजनेचे नेमके स्वरूप काय आहे, याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने जारी केली. त्यानुसार गरिबांना वीज जोडणी विनामूल्य दिली जाईल. इतरांना वीज जोडणीसाठी ५०० रुपये द्यावे लागतील. ही रक्कम वीज कंपनी बिलातून १० हप्त्यांत वसूल करेल.मात्र वीज जोडणी दिल्यानंतर, गरीब असो वा नसो, प्रत्येक ग्राहकास त्याने वापरलेल्या वीजेचे ठरलेल्या दराने पैसे मोजावे लागतील.मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार विनामूल्य किंवा ५०० रुपये घेऊन दिलेल्या जोडणीमध्ये जवळच्या विजेच्या खांबापासून ग्राहकाच्या घरापर्यंत विजेची तार टाकणे, विजेचे मीटर बसविणे आणि एक एलईडी बल्ब व एक मोबाईल चार्जिंग पॉर्इंट यांच्यासाठी वायरिंग करणेइत्यादी कामे केली जातील. घराजवळ विजेचा खांब नसेल तर तो टाकण्याचे कामही याच योजनेत केले जाईल.वीज जोडणीसाठीचे अर्ज व आवश्यक माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली जाईल. यासाठी ग्रामीण भागांमध्ये विशेष शिबिरे भरविण्यात येतील व आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर ग्राहकास जागच्या जागी वीज जोडणी मंजूर करण्यात येईल.२४ हजार कोटींचा महसूलया योजनेवर केंद्र सरकार सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करेल. परंतु योजना पूर्ण होऊन सर्व अपेक्षित चार कोटी ग्राहकांना वीज पुरविणे सुरु झाल्यावर त्यातून राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना दरमहा २४ हजार कोटी रुपयांचा जादा महसूल मिळेल, असे ढोबळ गणित आहे.या नव्या ग्राहकांमुळे वीजेची मागणी वर्षाला अंदाजे ८० हजार दशलक्ष युनिटने वाढेल व वीजेचा दर युनिटला सकारी ३ रुपये गृहित धरला तरी वीज कंपन्यांना २४ जहार कोटी रुपये जादा महसूल मिळेल.