शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

कुसुमाग्रज उद्यानाला येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 12, 2016 23:18 IST

नूतनीकरणाचा प्रस्ताव : सव्वा दोन कोटींच्या कामांना मंजुरी

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने पंचवटीत गोदाकाठी महापालिकेने उभारलेल्या काव्य उद्यानाचे दुष्टचक्र संपण्याची चिन्हे दिसत असून, उद्यानाला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेत नूतनीकरण व सुशोभिकरणासाठी सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिली आहे. विद्यमान उपमहापौर गुरुमित बग्गा हे स्वीकृत सदस्य असताना त्यांच्या संकल्पनेतून पंचवटीत गोदाकाठी ५९६० स्क्वेअर मीटर क्षेत्रात कुसुमाग्रज काव्य उद्यान साकारले होते. कुसुमाग्रजांच्या कवितांच्या शिळा, कारंजा, पाथवे आदि आकर्षण काही काळ राहिले; परंतु कालांतराने उद्यानाच्या देखभाल-दुरस्तीकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले. कुसुमाग्रज उद्यान एक प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले, शिवाय त्याठिकाणी अवैध धंदेही सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांकडून उद्यानाची साफसफाई केली जायची, त्यानंतर वर्षभर त्याकडे कुणी ढुंकूनही पाहायचे नाही. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही दोनवेळा उद्यानाला भेट देऊन पाहणी केली होती आणि उद्यानाच्या नूतनीकरणाचे व सुशोभिकरणाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रशासनाला पत्र लिहून सुशोभिकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने सुशोभिकरण व नूतनीकरणासाठी २ कोटी २४ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला असून मे. ओरीजीन आर्किटेक्ट्सच्या अपेक्षा कुटे यांनी त्याचे डिझाईन बनविले आहे. त्यामध्ये बांधकामावरच सुमारे १ कोटी ९३ लाख रुपये खर्च होणार असून, उद्यानविषयक कामांसाठी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सदर कामाच्या जाहीर निविदा मागविल्या जाणार आहेत. त्यापूर्वी उद्यानाची ८० टक्के जागा ही पूरनियंत्रण रेषेत रेड आणि ब्ल्यू लाइनमध्ये असल्याने निरीच्या निर्देशाप्रमाणे नगररचना आणि पर्यावरण विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. नूतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामाला लवकरात लवकर गती देऊन येत्या २७ फेब्रुवारीला कामांचे भूमिपूजन करण्याचा विचार सत्ताधारी गोटात सुरू आहे.(प्रतिनिधी)