शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेऐवजी पुरूषाचा दिला मृतदेह; अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच आला फोन अन् उडाला एकच गोंधळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 11:13 IST

Uttar Pradesh : एका महिलेचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर एकच गोंधळ सुरू झाला.

गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडाच्या कर्नलगंज येथील शवविच्छेदन गृहामध्ये मृतदेह बदलल्याची घटना समोर आली आहे. यानंतर कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, एका महिलेचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर एकच गोंधळ सुरू झाला.

कुटुंबीयांना महिलेचा नव्हे तर पुरुषाचा मृतदेह देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन गृहाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी सीएमओने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणी सीएमओ राधेश्याम केसरी यांनी सांगितले की, शवविच्छेदन गृहात मृतदेह बदलल्याची तक्रार आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

हे प्रकरण कोतवाली कर्नलगंज भागातील गुरसाडी गावचे आहे. येथे गेल्या शुक्रवारी 40 वर्षीय रिता देवी यांना वादात मारहाण करण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. रविवारी कुटुंबीय महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी पोहोचले होते. त्याचबरोबर, याप्रकरणी आरोपी संजयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं?रविवारी दुपारी 4 ते 5 या वेळेत मृत रिता देवी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह देण्यात आला. आम्ही सर्वजण मृतदेह घेऊन गुरसाडी या गावी आलो होतो. त्यानंतर तासाभराने शवविच्छेदन गृहामधून एक फोन आला. त्यावेळी तुम्ही लोक दुसऱ्या मृतदेहासोबत घरी गेला आहात. तुमच्याकडे जो आहे तो पुरुषाचा मृतदेह आहे. तो परत घेऊन या आणि महिलेचा मृतदेह घेऊन जा, असे फोनद्वारे सांगण्यात आल्याचे मृत रिता देवी यांचे पती सुरेश कुमार यांनी सांगितले. यानंतर एकच गोंधळ उडाला. 

वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्काररविवारी कोतवाली नगर येथील गोंडा पोलिसांनी रीता देवी (वय 40) या महिलेचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह न देता अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. त्यामुळे महिलेचे कुटुंबीय घरी पोहोचले, त्यानंतर फोन करून पुन्हा मृतदेह गोंडा  शवविच्छेदन गृहामध्ये आणण्यास सांगितले. मृतदेह घेऊन नातेवाईक गोंडा येथे गेले असता त्यांना महिलेचा मृतदेह मिळाला. त्यानंतर सायंकाळी उशिरा नातेवाईक मृतदेह घेऊन घरी पोहोचले. जिथे वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश