रेल्वे लुटणारी टोळी गजाआड रेल्वे पोलिसांची कारवाई: तिघांना अटक

By admin | Published: May 8, 2014 04:00 PM2014-05-08T16:00:57+5:302014-05-09T00:53:51+5:30

अहमदनगर: रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणार्‍या टोळीचा म्होरक्या पंकज दिलीप निमजे रा़दौंड याच्यासह तिघांना नगर रेल्वे स्थानकावर सापळा लावून पोलिसांनी पकडले़या टोळीकडून आणखी तिघा लुटारूंची नावे तपासात निष्पन्न झाली असून,लखनौ एक्सप्रेस, राजकोट एक्सपे्रसमध्ये लुटीचा प्रकार या टोळीकडून करण्यात आल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे़

Golmaal railway police action: Police arrest three | रेल्वे लुटणारी टोळी गजाआड रेल्वे पोलिसांची कारवाई: तिघांना अटक

रेल्वे लुटणारी टोळी गजाआड रेल्वे पोलिसांची कारवाई: तिघांना अटक

Next

अहमदनगर: रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणार्‍या टोळीचा म्होरक्या पंकज दिलीप निमजे रा़दौंड याच्यासह तिघांना नगर रेल्वे स्थानकावर सापळा लावून पोलिसांनी पकडले़या टोळीकडून आणखी तिघा लुटारूंची नावे तपासात निष्पन्न झाली असून,लखनौ एक्सप्रेस, राजकोट एक्सपे्रसमध्ये लुटीचा प्रकार या टोळीकडून करण्यात आल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे़
पंकज दिलीप निमजे वय २२,(रा़दौंड),संतोष दादाराव वेट्टी,वय ३५,(रा़दौंड),कुमार रमेश सरोटे,वय ३५,(रा़दौंड) अशी पोलिसांनी पकडलेल्यांची नावे आहेत़उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी असते़ गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारी टोळी अनेक दिवसांपासून सक्रिय होती़ उन्हाळ्यात रेल्वे लुटीला आळा घालण्यासाठी नगर रेल्वे पोलिसांनी टोळी पकडण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती़ या पथकाने वेषांतर करून लुटणार्‍यांची शोध मोहीम हाती घेतली होती़ पथकाने दौंडे रेल्वे स्थानकापासून गोवा एक्सप्रेस, कोपरगाव दरम्यान जनरल बोगीतून प्रवास केला असता पोलिसांना अकोळनेर जवळ रेल्वेत चोर शिरल्याची माहिती खबर्‍यामार्फत मिळाली़ त्यानुसार नगर रेल्वेस्थानकात पोलिसांनी चोर पळून जाऊ नये, यासाठी आधीच सापळा लावला होता़ नगर रेल्वेस्थानक येथून शिर्डी- मुंबई रेल्वेत बसून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला़मात्र पोलिसांनी आरोपींचा म्होरक्या पंकज याला पकडले़त्यानंतर त्याच्याकडून आणखी तिघांची नावे निष्पन्न झाली असून,इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
राजकोट एक्सप्रेस मध्यंतरी लुटण्यात आली होती़ सामान्य प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीने काही दिवसांपूर्वी नगर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे लुटली होती़ तेव्हापासून पोलीस या टोळीच्या शोधात होते़अखेर पोलिसांना ही टोळी पकडण्यात यश आले़ टोळीतील पंकज हा रेल्वे कर्मचार्‍याचा मुलगा आहे़ त्याला रेल्वेची बारीक सारीक माहिती असल्याने रेल्वे कुठे क्रॉसिंग होतात, याची सर्व माहिती पंकजला होती़ त्यामुळे ते सहजपणे रेल्वे लुटण्याचे काम करत होते़ मात्र पोलिसांनी अखेर सापळा लावून ही टोळी जेरबंद केली़ पोलिसी खाक्या दाखवताच टोळीने आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिली असून,आरोपींना मनमाड येथील लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ नगर रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एस़एस़ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली़पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस़डी दिवटे, बी़ बी़ सलगर,कॉ़कोंगे, देशमुख, टिंगरे, कांबळे यांचा समावेश होता़

Web Title: Golmaal railway police action: Police arrest three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.