शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

Gold Smuggling: तस्करीची अनोखी शक्कल! विगमध्ये लपवले 33 लाखांचे सोने, अधिकारी झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 14:46 IST

दुबईवरुन आलेल्या दोन प्रवाशांकडून एकून 45 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

वाराणसी: सोने-चांदी किंवा इतर वस्तुंची तस्करी करणारे नवनवीन शक्कल लढवत असतात. पण, तस्कराने कितीही शक्कल लढवली, तरी अधिकाऱ्यांच्या नजरेतून त्यांची ही तस्करी सुटत नाही. अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी विमानतळावर घडली आहे. येथील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी यूएईहून परतलेल्या दोन प्रवाशांकडून 45 लाख रुपयांचे सोने जप्त केले. 

व्हिडिओ व्हायरलशारजाहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने हे सोने आपल्या विगखाली(खोटे केसं) एका पाऊचमध्ये लपवले होते. विगच्या आत लपवलेले हे सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले असून, या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये अधिकारी डोक्यावर लावलेला विग काढताच आत एका काळ्या पॅकेटमध्ये सोने लपवलेले दिसत आहे. एनडीटीव्हीने याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

लाखोंचा मुद्देमाल जप्तअधिकाऱ्यांनी सांगितले की, विगमध्ये लपवलेल्या सोन्याचे वजन 646 ग्रॅम असून त्याची किंमत 32.97 लाख रुपये आहे. त्याच फ्लाइटमधील आणखी एका प्रवाशाकडून 238.2 ग्रॅम सोने सापडले आहे, ज्याची किंमत ₹12.14 लाख आहे. हे सोने प्रवाशाने पुठ्ठ्याला गुंडाळण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या थरांमध्ये लपवले होते.

दिल्लीतून दोन तस्कर अटकेतनुकतेच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन तस्करांना पकडण्यात आले. त्यापैकी एकाने सोन्याची पेस्ट आणली होती तर दुसऱ्यान परदेशी बनावटीच्या सिगारेट आणल्या होत्या. हे दोघे शारजाहून परतलेले होते. या विदेशी बनावटीच्या सिगारेटची किंत 9,54,000 रुपये आहे. याशिवाय 268 ग्रॅम सोन्याची पेस्टही जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 12,20,090 रुपये आहे. प्रवाशांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंAirportविमानतळ