शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोने पोहोचले ४३ हजारांवर! १० दिवसांत २१०० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:52 IST

लग्नसराईचा परिणाम; चांदीतही किलोमागे तीन हजारांची तेजी

- विजयकुमार सैतवाल जळगाव : भारतीय रुपयात सातत्याने होत असलेल्या घसरणीसह मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातीलही शेअर बाजार सतत गडगडत असल्यामुळे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे १० दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल दोन हजार १०० रुपयांनी तर चांदीमध्ये तीन हजारांची वाढ होऊन सोन्याचे भाव आणखी एका नवीन उच्चांकावर पोहोचले आहेत. शनिवारी सोने प्रथमच ४३ हजार रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले.१२ फेब्रुवारीला सोने ४० हजार ९०० रुपयांवर होते. त्यानंतर १३ फेब्रुवारीला ४१ हजारांवर पोहोचले. त्यात वाढ होत होऊन १९ फेब्रुवारीला ४१ हजार ७५० रुपयांवर भाव गेले. २० फेब्रुवारीला ४२ हजार रुपये भाव झाल्यानंतर २१ फेब्रुवारीला पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ४२ हजार ८०० रुपयांवर पोहोचले व शनिवारी ४३ हजारांचा टप्पा सोन्याने गाठला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात होत असलेली घसरण व लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने भाव वाढत आहेत. ते आणखी वाढण्याची शक्यता आहे.चांदीचेही भाव सतत वाढतेचचांदीचेही भाव सतत वाढतच आहेत. १३ फेब्रुवारीला ४६ हजार रुपये प्रती किलो असलेल्या चांदीचे भाव १५ फेब्रुवारीला ४७ हजार रुपयांवर पोहोचले. १८ ला ४७ हजार ५००, गुरुवारी ४८ हजार रुपये व शुक्रवारी ४९ हजार रुपये प्रती किलोवर चांदी पोहचली. शनिवारी चांदी ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिली.दीड महिन्यांत तीन नवे उच्चांकसोन्याच्या भावाचा विचार केला तर या मौल्यवान धातूने दीड महिन्यात तीन नवीन उच्चांक गाठले आहेत. ७ जानेवारीला सोने ४१ हजार ४०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर २० फेब्रुवारीला ४२ हजार रुपये व आता २२ फेब्रुवारीला ४३ हजार रुपये प्रती तोळा, असे उच्चांकाचे भाव सोने गाठत आहे.रुपयातील घसरणीसह शेअर बाजारातही घसरण होत असल्याने सोने-चांदीच्या गुंतवणुकीकडे कल वाढत आहे. त्यामुळे या धातूंचे भाव सातत्याने वाढत आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Goldसोनं