गोकुळाष्टमी उत्साहात
By admin | Updated: September 8, 2015 15:42 IST
जवळे : जवळे ता. पारनेर येथे गोकुळाष्टमी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरी झाली. जहागीरदारवाड्यात तीन दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रथम पुष्प हभप बाळासाहेब महाराज पठारे यांनी गुंफले. गोकुळाष्टमीच्या दिवशी हभप शिवाजी महाराज बोराडे यांचे कीर्तन झाले. संभाजी सोमवंशी यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
गोकुळाष्टमी उत्साहात
जवळे : जवळे ता. पारनेर येथे गोकुळाष्टमी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरी झाली. जहागीरदारवाड्यात तीन दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रथम पुष्प हभप बाळासाहेब महाराज पठारे यांनी गुंफले. गोकुळाष्टमीच्या दिवशी हभप शिवाजी महाराज बोराडे यांचे कीर्तन झाले. संभाजी सोमवंशी यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यात्रेकरुंचा सत्कारनेवासा : हज यात्रेला जात असल्याबद्दल फळांचे व्यापारी हुसेनभाई शेख व तुपीयाबी शेख यांचा सर्वधर्मीयांच्यावतीने सत्कार करण्यात आला. मुस्लीम समाजाचे धर्मगुरु मौलाना ईब्तेहाजोद्दीन अलीमसाब यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. फळबागांना जीवदानश्रीगोंदा : तालुक्यातील विसापूर, पिंपळगाव पिसा भागात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस फळबागांना वरदान ठरणारा आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.