नेपाळ, बांगलादेश, भूतानला जाणे झाले सोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:04 AM2020-06-22T03:04:36+5:302020-06-22T06:37:37+5:30

सीमेवर लागणा-या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा बंद होतील व सीमा ओलांडण्यास कमी वेळ लागेल.

Going to Nepal, Bangladesh, Bhutan became easy | नेपाळ, बांगलादेश, भूतानला जाणे झाले सोपे

नेपाळ, बांगलादेश, भूतानला जाणे झाले सोपे

googlenewsNext

नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : भारतातून रस्ते मार्गाने बांगलादेश, नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या प्रवासी बसेस आणि दुस-या व्यावसायिक वाहनांची वाहतूक सोपी होणार आहे. रस्तेवाहतूक व राजमार्ग मंत्रालय यासाठी सरळ नियम बनवण्याच्या तयारीत आहे. यामुळे सीमेवर लागणा-या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा बंद होतील व सीमा ओलांडण्यास कमी वेळ लागेल.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने भारतीय केंद्रीय मोटार वाहन (भारत व शेजारी देशांमध्ये परिवहन सेवा विनियमन-माल वाहतूक व प्रवासी वाहन वाहतूक) नियम २०२० चा मसुदा जारी केला आहे. यावर संबंधितांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले आहेत. या नंतर नवे नियम लागू करण्यासाठी अंतिम अधिसूचना जारी केली जाईल.
या नियमांतर्गत वाहनांना परमिट आणि संबंधित देशाच्या वाहनासंबंधी दस्तावेजांना समाविष्ट केले गेले आहे. यात वैध नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र, विमा पॉलिसीसंबंधी दस्तावेज असतील. याशिवाय प्रवाशांचे राष्ट्रीयत्वच्या तपशिलासोबत प्रवाशांची यादीही ठेवावी लागेल. वाहनचालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स तसेच त्याचा सहायक आणि वाहकाकडे बॅज व ओळखपत्र असणे आवश्यक आहे. नव्या नियमांअंतर्गत वाहनासमोर आणि मागे रवाना व्हायचे ठिकाण व पोहोचण्याचे ठिकाण याची माहिती द्यावी लागेल. याशिवाय वाहनावर रजिस्ट्रेशन क्रमांक असला पाहिजे. संबंधित राज्य सरकारांचे परिवहन अधिकारी सीमेवर असलेल्या इंटिग्रेटेड चेक पोस्टवर या दस्तावेजांची तपासणी करतील. सगळ््या बॉर्डर चेकपोस्टवर एक समान सुरक्षा,
गुप्तचर आणि आणीबाणीतील चिकित्सेसाठी जबाबदारी निश्चित केली जाईल.
अशा बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांसाठी आणीबाणीच्या अवस्थेत चिकित्सा सोयी उपलब्ध करण्यासाठी समन्वयाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारच्या चिकित्सा विभागाची असेल. इंटेलिजन्ससंंबंधी प्रकरणासाठी समन्वयाची जबाबदारी इंटेलिजन्स ब्युरो आणि त्याच्या नोडल एजन्सीवर असेल.
याशिवाय सुरक्षेची जबाबदारीही राज्य सरकारच्या पोलिसांची असेल. रवाना व्हायच्या आधी प्रवाशांकडील तिकिटे, बसचा फिटनेस, प्रवासी-चालक-सहायक आणि त्यांच्याकडील सामानाची तपासणीसाठी हे सुनिश्चित केले जाईल की कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू नाही.
>बससेवेमुळे वाढता तणाव थांबला
या शेजारी देशांसोबत बांगलादेश-भूतान-भारत-नेपाळ (बीबीआयएन) मोटर वाहन समझोत्याअंतर्गत बस सेवा चालवली जाते. भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रवासी ढाका-कोलकाता, ढाका-आगरतळा, कोलकाता-ढाका-आगरतळा आणि ढाका-शिलाँग-गुवाहाटी बसमधून ये-जा करतात.याशिवाय भारत- नेपाळ यांच्यात काठमांडू-सिलिगुडी, महेंद्र नगर-डेहराडून तथा काशी-काठमांडू बस धावते. याच प्रकारे पाकिस्तानसोबतही दिल्ली-लाहोर बस सेवा फेब्रुवारी १९९९ सुरू केली गेली. त्यामुळे दोन देशांंतील वाढता तणाव थांबवला गेला होता.

Web Title: Going to Nepal, Bangladesh, Bhutan became easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.